जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
महाराष्ट्र सरकारने मराठा आरक्षणाच्या बाबतीत सर्व सगेसोयरे आरक्षणाच्या कक्षेत आणून,राज्य सरकारने मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत.महाराष्ट्र राज्यात मराठा कुणबी नोंद असलेल्या व्यक्तींच्या सगेसोयऱ्यांना आरक्षणाचा लाभ मिळणार असल्याचे राज्य सरकारकडून स्पष्ट झाले आहे. त्याबाबत एक अधिसूचना ही,नवी मुंबईतील वाशी येथे जाऊन मराठा समाजाचे आंदोलन कर्ते मनोज जरांगे पाटील यांना देण्यात आली आहे.
काल मराठा समाजाचे आंदोलन कर्ते मनोज जरांगे पाटील यांना आंदोलन स्थळी येऊन,फळांचा रस देऊन,राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी उपोषणाची सांगता केली आहे.दरम्यान मराठा समाजाच्या आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर पूर्वीच गठीत केलेल्या शिंदे समितीला मुदतवाढ देण्याची, मराठा समाजाचे आंदोलन कर्ते मनोज जरांगे पाटील यांची विनंती,राज्य सरकारने मान्य केली आहे.त्याबरोबरच मराठा आरक्षणाच्या आंदोलनातील यापूर्वी जे मराठा बांधव व्यक्ती मृत पावले आहेत,त्यांना राज्य शासनाकडून नुकसान भरपाई देण्यात येईल असेही स्पष्ट झाले आहे.
आज महाराष्ट्र राज्य सरकारने घेतलेल्या मराठा आरक्षणाच्या बाबतीतील निर्णयामुळे,राज्यात ठिक-ठिकाणी आनंदासह जल्लोष साजरा करण्यात आला असून,जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मोठ्या प्रमाणात मिठाई वाटून,अतिशय बाजी करून,आनंद व्यक्त करण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्यात सर्वत्र राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयाचे, मराठा समाज बांधवांकडून स्वागत झाले असून,ठिकठिकाणी मराठा समाज बांधवांच्या आनंदाला उघाण काल आले होते.एकंदरीतच महाराष्ट्र सरकारने मराठा आरक्षणाच्या बाबतीत निर्णय घेऊन,आंदोलन कर्ते मनोज जरांगे पाटील यांच्यासह सर्व मराठी बांधवांना,नवी मुंबईतील वाशी येथेच,थांबवण्यात यश आले आहे,ही एक फार मोठी जमेची बाजू म्हणता येईल.