जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
कोल्हापूरात सध्या काही राजकीय पक्षांचे लोक हिंदु धर्माला डेंग्यू, फ्यू,मलेरियाची उपमा देत आहेत.! लव्ह जिहाद,धर्मांतर अशा समस्या हिंदु धर्मासमोर आहेत.ज्या मंदिरांमधून हिंदु धर्माचा प्रसार केला जातो अशा अनेक मंदिरांचे सरकारीकरण झाल्याने तेथे अनियमितता,भ्रष्टाचार यांसह अनेक समस्या आहेत.‘हलाल’ उत्पादनांच्या माध्यमातून हिंदूंच्या अर्थव्यवस्थेवर घाला घातला आहे.तरी यांसह विविध विषयांना वाचा फोडण्यासाठी मंगळवार,30 जानेवारी 2024 या दिवशी हुपरी येथील हुतात्मा स्मारक,ता.हातकणंगले,जि.कोल्हापूर येथे सायंकाळी 5.30 वाजता हिंदु धर्म-जागृती सभा घेण्यात येणार आहे.या सभेत हिंदुत्वाचा आवाज बुलंद करणारे आणि सलग तिसर्यांदा आमदार म्हणून निवडून येणारे भाग्यनगर येथील भाजप आमदार टी.राजासिंह यांचे मार्गदर्शन होणार आहे.तरी सभेला कोल्हापूर जिल्ह्यातील श्रीरामभक्त आणि तमाम हिंदूंनी मोठ्या संख्येने उपस्थित रहाण्याचे आवाहन सकल हिंदू समाजाच्या वतीने हिंदू एकताच्या कार्यालयात घेण्यात आलेल्या बैठकीत करण्यात आले.
या प्रसंगी सकल हिंदू समाजाचे समन्वयक श्री.दीपक देसाई म्हणाले, ‘‘प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजासिंह भाग्यनगर येथून हजारो किलोमीटरवरूप प्रवास करून केवळ हिंदू बांधवांना संबोधित करण्यासाठी येत आहेत. नुकत्याच रायपूर (छत्तीसगड) येथे बागेश्वर धामच्या वतीने आयोजित कार्यक्रमांत त्यांनी ‘भारतात हिंदु राष्ट्र स्थापन होईपर्यंत मी माझ्या कुटुंबाचा त्याग करत आहे’, अशी घोषणा केली आहे. तरी सर्व हिंदूंनी हिंदु धर्मांसाठी ३/४ तास वेळ काढून हुपरी येथील सभेसाठी हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे.’’ या प्रसंगी सकल हिंदू समाजाचे समन्वयक आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी म्हणाले, ‘‘ या सभेत सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये, तसेच हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. रमेश शिंदे यांचेही अमूल्य मार्गदर्शन होणार आहे. गेल्या काही वर्षांमध्ये हिंदुत्वावरील आघातांना काही प्रमाणात चाप बसला असला, तरी समस्या पूर्णपणे मिटलेल्या नाहीत. हिंदू नेत्यांच्या हत्या होत आहेत. आतंकवाद, नक्षलवाद यांचे वैचारिक समर्थन करणार्यांच्या झुंडी ‘विचारवंत’ म्हणवून घेत आहेत. गोहत्याबंदीचा कायदा काही राज्यांमध्ये असला, तरी अजूनही गोहत्या थांबलेल्या नाहीत. यांसह ‘लव्ह जिहाद’, लँड जिहाद, घुसखोरी, धर्मांतर या समस्या आवासून उभ्या आहेत, तसेच 9 राज्यांत हिंदू अल्पंसख्य झाले आहेत. या समस्यांवर ‘हिंदु राष्ट्रा’ची स्थापना हेच प्रभावी उत्तर आहे.’’
या प्रसंगी हिंदू एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष श्री.दीपक देसाई आणि तालुकाध्यक्ष श्री.अमर जाधव, बजरंग दलाचे श्री. पराग फडणीस,शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री.किशोर घाटगे, भ्रष्टाचारविरोधी जनजागृती समिती महाराष्ट्र प्रांत उपाध्यक्ष श्री.आनंदराव पवळ,हिंदू महासभा जिल्हाध्यक्ष श्री.मनोहर सोरप,पतितपावन संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री.आप्पासाहेब बन्नेनवार, कोल्हापूर जिल्हा कार्याध्यक्ष श्री.नामदेवराव जाधव, सचिव श्री.दौलतराव मोहिते,हिंदुत्वनिष्ठ श्री.संदीप घाटगे, शिवशाही फाऊंडेशनचे संस्थापक श्री.सुनील सामंत,श्री. कैलास(आबा) जाधव,विश्व हिंदु परिषदेचे जिल्हामंत्री श्री. अनिल दिंडे उपस्थित होते.