जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अजित निंबाळकर)
कोल्हापूर, येथील हुतात्मा क्रांती सामाजिक संस्था आणि कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे वतीने क्रांतीवीर चिमासाहेब महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्याला माजी नगरसेवक आर.डी. पाटील व एड.जगजीत आडनाईक यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी बोलताना अध्यक्ष किसनराव कल्याणकर यांनी क्रांतीवीर चिमासाहेब महाराजांचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान महत्वपूर्ण असून त्यामुळे चळवळीला दिशा प्राप्त झाली,असे प्रतिपादन केले. यावेळी पद्माकर कापसे व एड.जगजीत आडनाईक यांनी मनोगत व्यक्त केले.तसेच हुतात्मा क्रांती सामाजिक संस्था आणि कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे वतीने चिमासाहेब महाराज यांचा इतिहास याविषयावर पुस्तक प्रकाशित करण्यात येणार असल्याचे सांगितले.
यावेळी उपाध्यक्ष डाॅ.गुरुदत्त म्हाडगुत,चिन्मय सासने,एड. नवतेज देसाई,एड.अश्विनी भोसले, एड.हसिना शेख, जयकुमार शिंदे,लक्ष्मण मोहिते,सुनिल हंकारे,निलेश कांबळे, किशोर यादव यांच्यासह अनेक सामाजिक मान्यवर उपस्थित होते.