जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
वृत्त: सोशल मीडिया.
बिहारमध्ये पुन्हा नितीश कुमार यांनी भारतीय जनता पार्टीला सोबत घेऊन पुन्हा सरकार स्थापन करणार असल्याचे जवळपास निश्चित झाले असून,बिहारमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे.दरम्यान आपण जनतेसाठी काम करीत राहू असा निर्धार बिहार राज्याचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी बोलून दाखवला आहे.
आज पाटण्यामध्ये राष्ट्रीय जनता दलाची बैठक पार पडली असून,त्याबरोबरच भारतीय जनता पार्टीची ही स्वतंत्र बैठक पार पडली आहे.बिहार मधील सद्य परिस्थिती पाहून राजकीय निर्णय घेण्याचे अधिकार,सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांना राष्ट्रीय जनता दलाने दिली आहेत असे राज्यसभेचे खासदार मनोज झा यांनी सांगितले आहे.आज बिहारमध्ये वेगाने राजकीय स्थितीबाबत स्थित्यंतर घडत असताना,भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन,बिहारमधील सद्य परिस्थितीबाबत चर्चा केली आहे. यापूर्वी बेंगलोर मध्ये झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीतील मतभेदामुळे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे नाराज झाले असल्याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
भारतीय जनता पार्टीने इंडिया आघाडी कमकुवत करण्यासाठी,बिहारमध्ये सध्याचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या मागे राहण्याचा निर्णय घेतला असल्याचे दिसत आहे. एकंदरीतच बिहार मधील राजकीय परिस्थिती कशा पद्धतीने वळण घेते? हे पाहणे राजकीय दृष्ट्या महत्त्वाचे ठरेल.