जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा.जयंत पाटील साहेब यांनी 'एक तास राष्ट्रवादीसाठी - आगामी महाराष्ट्राच्या विकासासाठी - प्रभावी, प्रगल्भ,तरुण,पुरोगामी विचारांसाठी' या उपक्रमाची संकल्पना मांडली होती.या करिता दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी,संघटनेतील सर्वच फ्रंटल सेलच्या पदाधिकारी यांनी एकत्र बैठक आयोजित करून सर्वानी बैठकीला उपस्थित राहुन,या बैठकीमध्ये,देशाच्या,राज्याच्या जिल्ह्याच्या,तालुक्याच्या,सामाजिक,आर्थिक, राजकीय जडणघडणीची चर्चा या बैठकीत प्रामुख्याने होणे गरजेचे आहे.या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगली शहरजिल्ह्याच्यावतीने सांगली शहर जिल्हाध्यक्ष मा.संजयजी बजाज साहेब तसेच युवक शहर जिल्हाध्यक्ष मा.राहुलदादा पवार यांच्या सुचनेनुसार आज एक तास राष्ट्रवादी बैठक राष्ट्रवादी कार्यालय पार्टी ऑफिस( RIT) सांगली याठिकाणी पार पडली.
यावेळी बूथ कमिट्या सक्षम करण्यावर पदाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या देण्यात आल्या.तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शहर जिल्ह्याच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या महाआरोग्य शिबिरांचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांना उपलब्ध करून देण्यावर भर देणे.पक्षाच्या माध्यमातून जनतेच्या हिताची कामे झाली पाहिजेत त्यासाठी लोकसंपर्क वाढवावा,अशादेखील सूचना महालिंग हेगडे यांनी आज बैठकीत करण्यात केल्या.
यावेळी विधानसभा क्षेत्र अध्यक्ष सचिन जगदाळे यांनी लवकरच पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी बूथ यात्रा सुरु करण्यात येईल तसेच येणाऱ्या काळात सांगली विधानसभा क्षेत्रातून पक्षाचे मतदार आणि पक्ष संघटन वाढवण्यावर भर असेल असे सांगण्यात आले.तसेच यावेळी नूतन महिला सांगली शहर जिल्हाध्यक्ष मा.नगरसेविका संगीता हारगे यांनी कट्टर विचारधारेला विरोध करत आपल्या पक्षाची पुरोगामी विचारधारा जनतेमध्ये जाऊन रुजवली पाहिजे वाढवली पाहिजे प्रसंगी संघर्ष करावा लागलातर चालेल अशी भूमिका त्यांनी मांडत महिला संघटन महापालिका क्षेत्रात वाढवण्यावर आगामी काळात भर देण्यात येईल असे नमूद केले.
राष्ट्रवादी अल्पसंख्यांकचे प्रदेश उपाध्यक्ष समीर कुपवाडे बोलताना म्हणाले,प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब तसेच शहर जिल्हाध्यक्ष मा.संजय बजाज,युवक शहर जिल्हाध्यक्ष राहुल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाची ध्येयधोरणे,कार्यक्रम सां.मि.कु.महानगरपालिका क्षेत्रात पूर्ण ताकदीने राबविणेत येतील आणि येणाऱ्या काळात अल्पसंख्यांक कार्यकारणीची बांधणी करण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी दिली.
झोपडपट्टीवासियांसाठी नेहमीच काम करणारे समाजिक न्याय विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे लवकरच झोपडपट्टी नियमतीकरणासाठी लवकरच पक्षाच्या माध्यमातून न्याय देण्यासाठी मोठे जन आंदोलन उभे करण्यात येईल असे नमूद केले.देशात सुरु असलेल्या कट्टर पंथीयांना ज्यात्यावेळी आंदोलने आणि सनदशीर मार्गाने विरोध केला पाहिजे असे समाजिक न्याय विभागाचे गँब्रियल तिवडे म्हणाले.तसेच यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस सांगली शहर जिल्ह्याच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या आरोग्य शिबिरांची माहिती आज पक्षाचे आरोग्यदूत उमर गवंडी यांनी पदाधिकाऱ्यांना देऊन आभार मानले.
यावेळी सांगली विधानसभा क्षेत्र अध्यक्ष सचिन जगदाळे,महिला शहरजिल्हाध्यक्षा सौ.संगीता हारगे,कुपवाड शहर अध्यक्ष तानाजी गडदे,उत्तम कांबळे,समीर कुपवाडे, अनिता पांगम,छाया जाधव,शिवाजी दुर्वे,मुस्ताक रंगरेज,डॉ शुभम जाधव,महालिंग हेगडे,गब्रियल तिवडे,सुभाष तोडकर, विद्या कांबळे,संगीता जाधव,सुरेखा सातपुते,महावीर खोत,प्रकाश सूर्यवंशी,फिरोज मुल्ला,कुमार वायदंडे,उमर गवंडी,मुन्ना शेख,दत्ता पाटील,अभिजित रांजणे,युवराज नायकवडे,सरफराज शेख,वैशाली धुमाळ,रेहाना सय्यद, दीपाली हारगे,लक्ष्मण मोने,सनाउल्ला बावचकर,अमीन शेख,विजय जाधव,संजय देवकुळे,जावेद जमादार,निहाल सय्यद,आदर्श कांबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सेवादल,युवक,अल्पसंख्याक,आरोग्य विभाग,कामगार सेल,समाजिक न्याय विभाग सर्व फ्रंटल सेलचे प्रमुख,आजी माजी नगरसेवक,पदाधिकारी तसेच प्रमुख महिला पदाधिकारी आदी उपस्थित होते.