जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
महाराष्ट्र राज्यात थंडीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होणार असून,येत्या 2 दिवसात थंडीची लाट येणार असल्याची माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिली आहे.दरम्यान सध्या उत्तर भारतामध्ये सर्वत्र थंडीच्या धुक्याची चादर पसरली असून,हरियाणा,उत्तर प्रदेश,बिहार,चंदिगड,पंजाब आदि राज्यांमध्ये थंडीचे वातावरण जोरदारपणे दिसून येत आहे. दिल्ली,हरियाणा मधील विविध ठिकाणी 2 ते 5 अंश इतक्या तापमानाची नोंद झाली असून,हरियाणातील हिस्सार मध्ये सर्वात कमी तापमान म्हणजे 1.1 अंश सेल्सिअस इतके खाली घसरले आहे.
भारतीय हवामान शास्त्र विभागाच्याकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार,येत्या 2 दिवसात थंडीमध्ये वाढ होणार असून, महाराष्ट्र राज्यात याचा परिणाम पाहावयास मिळेल अशी शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे.