जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
मार्गशीर्ष गुरुवार महालक्ष्मी व्रत उद्यापन मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी करतात.परंतु यावर्षी शेवटच्या गुरुवारी दि. 11जानेवारी 2024 रोजी अमावस्या आहे.त्यामुळे सगळीकडे गैरसमज पसरला आहे 4 च गुरुवार उपवास करून,व्रताचे उद्यापन व सवाष्ण भोजन,4 थ्या गुरुवारी करायचे अशी माहिती सगळीकडे पसरली आहे,परंतु हे चुकीचे आहे व शास्त्र ग्राह्य नाही.
मार्गशीर्ष गुरुवार व्रतानुसार शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावे असा नियम आहे.त्यामुळे अमावस्या असली तरीही उद्यापन हे करावे असेच आहे.तसेच अमावस्या सायंकाळी 5 वाजून 27 मिनिटांनी समाप्त होत आहे व मार्गशीर्ष गुरूवारचे पूजन हे संध्याकाळी करतात त्यामुळे सायंकाळी 5 वाजून 27 मिनिटा नंतर उद्यापन करण्यास काहीच अडचण नाही,आणि तसेही अमावस्या अशुभ नाही.
त्यामुळे 11 तारखेला 5 व्या गुरुवारी उपवास,व्रत उद्यापन, सवाष्ण भोजन करावे,तरच व्रत पूर्ण होईल असा सल्ला साई कृपा ज्योतिष कार्यालय टिटवाळा कल्याण यांनी दिला असून, आम्ही तो जनहितार्थ प्रसिद्ध करत आहोत.