जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
महाराष्ट्र राज्याच्या पोलिस महासंचालकपदी वरिष्ठ पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांची नियुक्ती आज राज्य शासनाने केली असून,महाराष्ट्र पोलीस सेवेच्या प्रशासनात,सर्वोच्च पदावर बसणाऱ्या त्या एक पहिल्या महिला पोलीस अधिकारी झाल्या आहेत.1988 च्या आय.पी.एस.तुकडीच्या रश्मी शुक्ला या अधिकारी असून,या पूर्वी त्या सीमा सशस्त्र दलाच्या महासंचालकपदावर कार्यरत होत्या.
महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक रजनीशेठ यांच्या 31 डिसेंबर2024 च्या झालेल्या निवृत्तीनंतर,महाराष्ट्र राज्याच्या पोलिस महासंचालकपदी वरिष्ठ पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्या नावावर आज अखेर शिक्कामोर्तब झाले. राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती झालेल्या रश्मी शुक्ला यांनी यापूर्वी,राज्य गुप्तचर विभागाच्या संचालकपदाची,पुणे पोलीस आयुक्तपदाची तसेच अशा विविध महत्त्वाच्या पदांची धुरा सांभाळली होती.
महाराष्ट्र राज्याच्या पोलिस महासंचालकपदी नियुक्ती झालेल्या रश्मी शुक्लांचा कार्यकाळ हा जवळपास 6 महिन्याचा असणारा असून,त्यानंतर त्यांना पुढे मुदतवाढ मिळती का नाही? हे बघावे लागेल.एकंदरीत राज्य शासनाच्या पोलीस प्रशासनामध्ये त्या एक कार्यक्षम वरिष्ठ पोलीस अधिकारी म्हणून सर्वत्र ओळखल्या जातात.