जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(हुपरी- प्रतिनिधी)
अन्याय विरोधक सेवा समिती महाराष्ट्र राज्य कोल्हापूर जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकारितेचे आद्य गुरु बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीच्या व अन्याय विरोधक सेवा समिती वर्धापन दिनाच्या अनुषंगाने फळे वाटप चा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता.
अन्याय विरोधक सेवा समिती ही संपूर्ण महाराष्ट्र मध्ये सामाजिक,शैक्षणिक,धार्मिक,अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये कार्यरत असून या समितीमार्फत गोरगरीब विद्यार्थ्यांना देखील शैक्षणिक मदत करण्यात त्यांनी कसर केली नाही.सामाजिक कार्य करत असताना कोणताही मतभेद न ठेवता विश्वासाने ही समिती काम करीत असून पत्रकार दिनाच्या अनुषंगाने हुपरी, इचलकरंजी,येथील हॉस्पिटल मध्ये जाऊन त्यांनी आजारी लोकांना फळे वाटपाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात घेतला.
यावेळी संस्थापक अध्यक्ष संतोष वाडकर,महाराष्ट्र राज्य अध्यक्षा- वैशालीताई कंगणे,महाराष्ट्र राज्य अध्यक्ष-युन्नुस मुल्ला व त्यांचे कार्यकर्ते उपस्थित होते.