जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
सांगलीत सांगली शहर जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या वतीने नवीन निवडी जाहीर करण्यात आल्या...
सांगली शहर जिल्हाध्यक्ष सौ.संगीता अभिजीत हारगे यांनी संगीता जाधव यांची जिल्हा उपाध्यक्षपदी निवड केली.आणि स्नेहा सुतार यांची शहर जिल्हा चिटणीस पदी निवड केली. यावेळी बोलताना शहर जिल्हाध्यक्ष संगीता हारगे म्हणाल्या की पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.शरदचंद्रजी पवार साहेब,प्रदेशाध्यक्ष जयंतरावजी पाटील साहेब,मा.खा.सुप्रियाताई सुळे,महिला प्रदेशाध्यक्ष मा.रोहिणी ताई खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर जिल्ह्यामध्ये संघटनात्मक बांधणी करून पक्ष बळकटीकरणाची आणि मजबुतीकरणाची जबाबदारी नवीन पदाधिकाऱ्यांच्या सोबत सर्वच पदाधिकाऱ्यांची असणार आहे. त्याचबरोबर महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात आवाज उठवून सर्वसामान्य महिलांना न्याय देण्याचा संघटनेकडून प्रयत्न केला जाईल.
यावेळी शहर जिल्हाध्यक्ष संगीता हारगे,माजी नगरसेविका पवित्रा केरीपाळे,प्रदेश सरचिटणीस ज्योती आदाटे,शहर जिल्हा उपाध्यक्ष संगीता जाधव,शहर जिल्हा चिटणीस स्नेहा सुतार,रेखा कांबळे,सुनीता जगधने,प्रियंका तूपलोंढे,वैशाली धुमाळ,नम्रता साळुंखे,सुरेखा सातपुते,संगीता जाधव,छाया पांढरे यांच्यासह महिला आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.