जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
पुणे येथे काल शिक्षण आयुक्तांसोबत झालेल्या बैठकीचा गोषवारा पुढीलप्रमाणे:-
1) वाढदिवसाच्या व्यापगत पदावर मंजुरी मिळालेल्या शिक्षकांचे समायोजन पुढील पंधरा दिवसात पूर्ण करणार.
2) कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेशित व आधार वैध न झालेल्या, विद्यार्थ्यांची संच मान्यतेत गणना करण्यासाठी 90% च्या पुढे वैधतेचे काम केलेल्या महाविद्यालयांना दिलासा देण्यासंबंधी निर्णय घेणार.
3) कनिष्ठ महाविद्यालयाच्या संच मान्यतेसाठी,विद्यार्थी संख्येची अट शिथिल करण्यासाठी आठ दिवसात अभ्यास करून निर्णय घेणार.
4) मान्यताप्राप्त आयटी शिक्षकांना वेतन मान्यता देण्यासंदर्भात शासनाला पत्र देणार.
5) वरिष्ठ व निवड श्रेणी चे प्रशिक्षण ऑनलाइन पद्धतीने वेळेत घेणार,तसेच प्रशिक्षणासाठी सेवेची अट एक वर्षांनी शिथिल करणार.
6) कनिष्ठ महाविद्यालयांच्या पर्यवेक्षक उपप्राचार्य पदाच्या नियुक्त्या करण्यासंबंधी संबंधित संस्थेला उपसंचालकांमार्फत पत्र देणार.तसेच कनिष्ठ महाविद्यालयाचा स्वतंत्र संवर्ग याबाबत नवीन शैक्षणिक धोरणाला अनुषंगून अभ्यास करून निर्णय घेणार.
7) शासन आदेशाप्रमाणे यापुढे सर्व जिल्ह्यातील शिक्षकांचे वेतन राष्ट्रीयकृत बँकेमार्फत होणार.
8) तासिका व अर्धवेळ तत्वावरील नियुक्त शिक्षकांच्या मान्यता त्वरित देणार.
9) शिक्षकांना अशैक्षणिक कामे देऊ नयेत.(ब्लॉक कामे) यासाठी लवकरच आदेश काढणार.
10) लेखाधिकार्यांनी वेतन निश्चिती विना विलंब करावी वेतन पथकाने सर्व प्रकारची देयके स्वीकारावीत यासाठी त्यांना योग्य ते पत्र देणार.
11) मुंबई विभागातील 2012/13 या शैक्षणिक वर्षातील नियुक्त शिक्षकांना नियुक्ती दि.पासून मान्यता देण्यासंदर्भात शिक्षण विभागाशी चर्चा करून लवकरच निर्णय घेणार.
12) मुंबईतून कल्याण येथे स्थलांतरित करण्यात आलेल्या ज्ञान सरिता महाविद्यालयाच्या शिक्षकांचे वेतन,अतिरिक्त शिक्षक समायोजन व पेन्शन संबंधित समस्यांचे वस्तुनिष्ठ पत्र प्राप्त होताच त्यावर निर्णय घेण्याचे आश्वासन.
13) सोलापूर येथील संगमेश्वर महाविद्यालयातील शिक्षकांच्या वेतनश्रेणीतील प्रलंबित मान्यता तत्काळ देणार.
14) बारावीच्या बोर्ड परीक्षेत सर्वदूर राज्यात एकसूत्रता आणण्यासाठी विद्यार्थी व पर्यवेक्षक स्थलांतराबाबत बोर्डाच्या अध्यक्षांशी चर्चा करून योग्य तो निर्णय घेणार
या व इतर मागण्यांवर सकारात्मक चर्चा मा.आयुक्त सुरज मांढरेसाहेब व संबंधित अधिकाऱ्यांनी केल्या.नाशिक विभागाचे पदवीधर आमदार सत्यजित तांबेसाहेब यांच्या समवेत झालेल्या या बैठकीस मा.आयुक्त मांढरेसाहेब,संचालक सूर्यवंशी साहेब,आत्तार साहेब,पुणे विभागाचे उपसंचालक अहिरे साहेब,व शिक्षण विभागाचे इतर अधिकारी तसेच महासंघाच्या वतीने अध्यक्ष डॉ.प्रा.संजय शिंदे सचिव प्रा.संतोष फाजगे,प्रा.विक्रम काळे,प्रा.एकनाथ माळी आदी पदाधिकारी उपस्थित होते.