मायग्रेन म्हणजे काय ? त्यावरील उपायासाठी अत्यंत उपयुक्त माहिती.!--

0

 आरोग्य भाग-30.

जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.

(अनिल जोशी)

डोकेदुखी हा आजार वेगवेगळ्या पद्धतीचा असतो. जीवनशैलीमुळे होणारा त्रास म्हणजे मायग्रेन त्यालाच आपण अर्धी डोकेदुखी म्हणतो.अमेरिकेतील प्रत्येकी पाच महिलांपैकी एका महिलेला त्रास होतो तर यूकेमध्ये चार पैकी एक महिलेला मायग्रेनने त्रस्त केले आहे.भारतामध्ये ह्या मायग्रेनचा त्रास बर्‍याच लोकांमध्ये आढळतो.पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये ह्याचे प्रमाण जास्त असते.हा आजार साधारणत: 20 ते 45 वयोगटातल्या लोकांना जास्त प्रमाणात होतो. 50 वर्षांवरील वयाच्या लोकांना हा होत नाही.हा त्रास उच्चभ्रू लोकांना जास्त होतो.फिल्डमध्ये 25 टक्के मुलांमध्ये हा त्रास असतो.असा जीवघेणा हा त्रास आहे. हा आजार ठीक करण्यास त्रासदायक असून ही एक जागतिक समस्या आहे. परंतु ह्यावर निश्चित उपचार उपलब्ध नाही. आयुर्वेदाने ह्याचा उपचार शक्य आहे.

◾लक्षणे -

- ह्या आजारात तीव्र स्वरूपाची डोकेदुखी.

- डोक्याच्या अर्ध्या भागातच डोकेदुखी असते.

- वेदना हळूहळू वाढत जातात,हालचालीने वेदना वाढतात.

- काही लोकांना डोकेदुखीसोबतच मळमळ होणे,उलटी होणे, आवाज सहन न होणे,प्रकाश सहन न होणे.ही लक्षणे आढळतात.

- हा त्रास साधारणत: 24 ते 72 तासांपर्यंत टिकून राहतो.

- स्त्रियांना मासिक पाळीच्या वेळी किंवा हार्मोन्स प्रमाण कमी - जास्त होण्याने हा त्रास होतो.

- काही रुग्णांमध्ये डोकेदुखी होण्याच्या पूर्वी स्वत:ला होणार्‍या ठराविक लक्षणावरून माहित पडते की त्यांना मायग्रेनचा अटॅक येणार आहे.

◾उपचार -

आयुर्वेद शास्त्रानुसार आम्लपित्त - अजीर्ण ह्याची जी कारणे व लक्षणे सांगितलेली आहेत,तीच कारणे व लक्षणे ह्या आजारात पाहायला मिळतात.ह्या आजारात शरीरातील दोष व लक्षणे बघून नाडीपरीक्षा करून विशिष्ट प्रकारण्ची शोधन चिकित्सा केली तर हा आजार आटोक्यात येऊ शकतो.मायग्रेनमध्ये दोषानुसार,वमन,विरेचन,रक्तमोक्षण,नस्य जलौकावचारण ह्यापैकी एका शोधन चिकित्सेचा उपयोग केल्यास फायदा होतो.ह्या आजारापासून सुटकाही होऊ शकते.

काही दिवसआयुर्वेदातील पथ्यादी काठा,प्रवाळ इत्यादीसारखी औषधीसुद्धा घेतल्याने हा त्रास बरा होतो.

◾कारणे हेतू -

आतापर्यंत जे काही ह्या आजारावर संशोधन झाले आहे, त्यानुसार ह्या आजाराचे निश्चित कारण किंवा तपासणी सांगता येत नाही.परंतु खाली दिलेली काही कारणे ह्या आजाराला उत्पन्न करतात.

1. अवेळी जेवण भूक नसताना जेवणे व उपवास.

2. अनियमित झोप,अति झोप,कमी झोप.

3. अति प्रवास.

4. जेवण करताना जास्त पाणी पिणे.

5. spicy जेवण नियमित घेणे.

6. pain killers चा अधिक वापर (रुग्ण स्वत: मनाने करतात)

7. कुटुंबनियोजनार्थी वापरण्यात येणारी औषधी, हार्मोन्स थेरपी इत्यादी.

8. hereditary

9. सूर्यप्रकाशात जास्त फिरणे.

10. चिंता,कामाची घाई.

11. पचायला जड पदार्थ खाणे.

12. मनात नेहमी छोटया गोष्टींचा विचार करत राहण्याची सवय.

◾मायग्रेनसाठी (डोकेदुखी)घरगुती उपाय...

1. सकाळी 4 वाजता उठून जिलेबी 2 वेडे व दूध पिऊन झोप घ्यावी.ह्याने डोकेदुखी बंद होते.

2. या प्रमाणेच दुधमलई व साखर घेतल्याने फायदा होतो.

3. झोप पूर्ण घ्यावी.

4. vit.b complex घ्यावे.

5. रात्री जागरण टाळावे.

6. खोबर्‍याच्या तेलाने हळूवार मालिश करावी.

7. पत्ताकोबीच्या पानाने मानेला व डोक्याला बांधून ठेवल्यानेही हा त्रास कमी होतो.

8. जेवण वेळेवर घ्यावे.

9. झोपताना टी.व्ही.बघू नये,शिवाय ह्या रुग्णांनी नेहमी अंधारमय खोलीतच झोपावे.

10. मानेची स्ट्रेचिंग व्यायाम.

11. बर्फाच्या गोळ्याने शेकल्यावर मायग्रेन बरा होतो.

12. आद्रक किंवा सुंट खाल्यास अजीर्णजन्य मायग्रेन बरा होतो.

हा लेख आरोग्य सेतू श्री.जयसिंग पाटील यांचे कडून संपादन करून,जनहितार्थ प्रसिद्ध करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top