आरोग्य भाग- 27
जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
डोळ्याभोवती असलेली काळसर वर्तुळे नाहीशी करण्यासाठी काही घरगुती उपाय खालील प्रमाणे आहेत...
●चंदन आणि जायफळाची पेस्ट डोळ्यांभोवती रात्री लावून ठेवावी.सकाळी धुऊन टाकावे.यामुळे डोळ्यांना गारवा मिळून त्याखालील काळी वर्तुळे नाहीशी होतील.
●गाजराचा कीस,बीटाचा कीस,कच्चे दुध समप्रमाणात एकत्र करून डोळ्याखाली किंवा डोळ्याच्या अवती-भोवती हलका मसाज करावा. डोळ्याच्या भोवती आलेली काळी वर्तुळे नाहीशी होतील.
●डोळ्यांच्या खाली काळी वर्तूळे तयार झाली असल्यास रोज डोळ्यांच्या खालच्या बाजूस कच्च्या बटाट्याच्या तुकड्यांनी हलकी मालिश करावी.काळी वर्तूळे हळू-हळू कमी होण्यास मदत होईल.
●पिंपल्स व डोळ्याखाली काळी वर्तुळे असतील तर कच्ची पपई किसून लावावी.
इतर उपाय -
● काकडीच्या थंडगार चकत्या,मोगऱ्याचा गजरा,बर्फ रुमालात बांधून डोळ्यावर ठेवून दहा ते पंधरा मिनिटे शांत झोपावे.
● संगणकावर जास्त वेळ काम केले तर डोळे थकतात.अशा वेळी दर दोन ते तीन तासाने पाण्याचा हबका डोळ्यावर मारावा.मग रुमालाने डोळे हलकेच टिपावे.
हा लेख आरोग्य सेतू जयसिंगराव पाटील यांच्या माध्यमातून, संपादन करून जनहितार्थ प्रसिद्ध करण्यात येत आहे.