जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
भारतीय शेअर बाजारात आज निर्देशांकात सलग वाढ होत असल्याचे दिसत असून,जवळपास सर्व कंपन्यांच्या निकालाला सुरुवात होत असल्याच्या पार्श्वभूमीवर,ही वाढ होत असल्याचे दिसत आहे.आजच्या भारतीय शेअर बाजाराच्या सेन्सेक्स मध्ये 63.47 अंश तर निफ्टी सेन्सेक्स मध्ये 28.50 अंशाने वाढ झाली.आज ऑइल अँड गॅस,वाहन निर्मिती कंपन्या,सरकारी बँका,वस्तू निर्मिती कंपन्या,सिमेंट कंपन्या, वाहन निर्मिती कंपन्या आदींच्या शेअर्समध्ये भाव वाढ झाल्याचे दिसून आले.
भारतातील प्रमुख आयटी कंपनी असलेल्या इन्फोसिसचा, डिसेंबर अखेरचा तिमाही निकालात,नफ्यामध्ये 7.3 टक्क्यांनी घट झाली असून,त्यांना 6106 कोटी रुपये नफा मिळाला आहे. भारताच्या चलनवाढीच्या तपशीलाची माहिती शुक्रवारी येणार असल्याने,शेअर बाजारात फरक जाणवेल शिवाय काही कंपन्यांच्या शेअर्समध्ये चढ-उतार होण्याची शक्यता आहे.आज भारतीय शेअर बाजारात इन्फोसिस,हिंदुस्थान युनिलिव्हर,विप्रो,लार्सन अँड टुब्रो,नेस्ले,सन फार्मा आधी कंपन्यांचे शेअर्सचे दर थोड्या प्रमाणात घसरले.भारतातील सर्वात आयटी कंपन्यांमध्ये प्रमुख असलेली टाटा कन्सल्टन्सी सर्विसेसला,डिसेंबर अखेरीसच्या तिमाही निकालात नफा झाल्याचे दिसून आले आहे.एकंदरीत यापुढील भारतीय शेअर बाजारातील निर्देशांकात चढउतार कसे राहतील? हे बघणे विशेष महत्त्वाचे ठरेल.