जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
द जर्नलिस्ट असोसिएशन पत्रकार संघटनेच्या वतीने,मराठी पत्रकारितेचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्त,प्रथमतः अभिवादन करण्यात आले.द जर्नलिस्ट असोसिएशन पत्रकार संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रामदास ताटे यांच्या निगडी येथील मुख्य कार्यालयात, पत्रकारांना पुष्प गुच्छ देऊन पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
६ जानेवारी हा मराठी पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. बाळशास्त्री जांभेकरांच्या दर्पणपासून सुरू झालेली मराठी पत्रकारिता आता डिजिटल झाली आहे.लाखो तरुण- तरुणी वेबसाइट्स आणि युट्युब चॅनेलहून व्यक्त होत आहेत,आणि आपल्या भागाचे,समुदायाचे प्रतिनिधित्व करताना दिसत आहेत.
पत्रकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱे पत्रकार इम्रान सिराज शेख यांची द जर्नलिस्ट असोसिएशन पत्रकार संघटनेच्या पुणे जिल्हा अध्यक्ष पदी निवड करण्यात आली, व रजाक साहेबलाल शेख यांची मावळ तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली व दोन्ही पत्रकारांना नियुक्ती पत्र महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रामदास ताटे यांच्या हस्ते देण्यात आले.
यावेळी मानव आधार सामाजिक संघ महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष बाबू हिरमेठकर यांनी उपस्थित पत्रकारांना वही व पेन भेट देऊन पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी ह्युमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष एम.डी.चौधरी,मानव आधार सामाजिक संघ महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष बाबू हिरमेठकर,द जस्ट आज वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी चंद्रशेखर पात्रे,विषेश तपास संपादक राजु इंगळे,पुणे खबर संपादक रजाक साहेबलाल शेख,दैनिक राज्य लोकतंत्र प्रतिनिधी इम्रान सिराज शेख,न्यूज एक्स्प्रेस 18 मुख्य संपादक श्रीनिवास माने,साप्ताहिक वास्तवता संपादक मिलिंद ज्ञानदेव शिंदे,न्यूज महाराष्ट्र के नाईन पिंपरी चिंचवड सचिव गणेश पाटील,न्यूज महाराष्ट्र के नाईन उपसंपादक रोहित रामदास ताटे,अर्थमुव्हर्स असोसिएशन पिंपरी चिंचवड RPI अध्यक्ष श्रीमंत शिवशरण,मनसे मावळ उपाध्यक्ष मोजेस दास,ह्युमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शन संघटनेचे देहूरोड शहर अध्यक्ष रवींद्र चोपडे,संघटनेचे सदस्य सुशांत जोगदंड,इराणी अली पठाण,यल्लाप्पा सालूटगी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रशेखर पात्रे यांनी केले.व शेवटी इम्रान शेख यांनी आलेल्या सर्व मान्यवरांचे आभार मानले.