जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
सांगलीतील वसंतदादा औद्योगिक वसाहत सहकारी सोसायटी लि.सांगली येथे उद्योग परिसंवाद कार्यक्रमाच्या निमित्ताने "उद्योगाची सद्यस्थिती व अडीअडचणी" या विषयावर माजी मुख्यमंत्री मा.पृथ्वीराजबाबा चव्हाण यांनी मार्गदर्शन केले.
शासनाकडून सर्वच पातळीवर उद्योगांना दुय्यम स्थान देण्यात आल्यामुळे महाराष्ट्राची प्रगती खुंटत जाऊन राज्य मागे राहण्याची परिस्थिती निर्माण झाली असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.विद्यमान परिस्थितीमध्ये भारतीय उद्योगव्यवस्थेला कोणत्या अडचणींचा सामना करावा लागत आहे आणि त्यावर कशाप्रकारे मात करता येईल याची योग्य मांडणी बाबांनी आपल्या मार्गदर्शनावेळी केली.
याप्रसंगी वसंत दादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.विशालदादा पाटील, पृथ्वीराज फाउंडेशनचे अध्यक्ष मा.पृथ्वीराज बाबा पाटील,वसंतदादा औद्योगिक वसाहत सोसायटीचे चेअरमन सचिन पाटील,कृष्णा व्हॅली चेंबर्स चे चेअरमन सतीश मालू,मराठा उद्योजक फाउंडेशनचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील,सांगली मिरज मॅन्युफॅक्चरर असोसिएशनचे पदाधिकारी,वरील सर्व संस्थांचे पदाधिकारी, उद्योजक यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
स्वागत आणि प्रास्ताविक सचिन पाटील यांनी तर आभार प्रदर्शन संचालक विजय भगत यांनी केले.