जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
हजारो रामभक्तांच्या साक्षीने कल्पद्रुम क्रिडांगणावर भव्य दिव्य अशा श्रीराम मंदीराशेजारी गीत रामायण सादरकरणाचा फिल आला.पृथ्वीराज पाटील व डॉ.पतंगराव कदम फौंडेशनने श्रीराम भक्तीचा उत्सव आयोजित करुन सांगली राममय करुन टाकली असे भावपूर्ण उद्गार स्वरवैभवचे प्रमुख परेश पेठे आणि त्यांच्या कलाकार टीमने काढले.आज श्रीराम भक्ती उत्सवात चौथ्या दिवशी सांगलीच्या स्वरवैभव कलाकार टीमचा 'गीत रामायण' हा गदिमांच्या गीत गायनाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी हजारोंच्या संख्येने रामभक्त तल्लीन होऊन ऐकत होते.
यावेळी परेश पेठे आणि कलाकारांनी गदिमांच्या गीतरामायणातील १८ निवडक गीतातील निवडक कडवे सादर केली.काळजाला भिडणारी सुश्राव्य स्वररचना,मानवी प्रवृत्ती आणि भावभावनांचे दर्शन श्रीराम कथांचे भाग श्रोत्यांच्या अंतःकरणाचा ठाव घेणारे होते.अभिजित कुलकर्णी यांचे निवेदन अत्युच्च दर्जाचे होते.स्वये श्रीराम प्रभू ऐकती,कुश लव रामायण गाती,सरयू तीरावरी अयोध्या,दशरथा घे हे पायसदान,राम जन्मला ग सखी, स्वयंवर झाले सीतेचे,माता न तू वैरिणी,पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा,पेटवी लंका हनुमंता, सेतू बांधा रे सागरी,भूवरी रावण वध झाला व गा बाळांनो श्री रामायण या गीतांना श्रोत्यांनी भरभरुन दाद दिली.
यावेळी परेश पेठे आणि कलाकार टीमचा पृथ्वीराज पाटील व पृथ्वीराज पाटील फौंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी सत्कार केला. यावेळी अयोध्या यात्रेसाठी दि. २४ तारखेची दहा भाग्यवानांची लकी ड्रॉ सोडत काढण्यात आली.स्वरवैभव टीमचे प्रमुख परेश पेठे आणि कलाकार,मराठी चित्रपट सृष्टीचे निर्माता सुनिल फडतरे,गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्टचे ट्रस्टी तावदारे अण्णा,प्राचार्य ताम्हणकर,उत्कृष्ट निवेदक अभिजीत कुलकर्णी यांच्या हस्ते आरती झाली.गीतरामायणाचे सूत्रसंचालन अभिजीत कुलकर्णी यांनी केले व आभार प्रा.एन.डी.बिरनाळे यांनी मानले.
यावेळी बाजार समितीचे संचालक प्रशांत पाटील मजलेकर व काडाप्पा वरद,माजी संचालक शितल पाटील,बाळासाहेब काकडे,भिमा तावदारे,चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष अमर देसाई,व्यापारी राजेंद्र पाटील,सचिन घेवारे,प्रशांत बाळगोंडा पाटील,दिपक चौगुले,नितीन तावदारे,एन.एम.हुल्याळकर व पृथ्वीराज पाटील फौंडेशनचे अध्यक्ष बिपीन कदम,उपाध्यक्ष सनी धोतरे,पदाधिकारी व सदस्य आणि हजारो रामभक्त उपस्थित होते.