- सोहळा विविध धार्मिक उपक्रमांनी उत्साहात साजरा
- शेतातील सर्व कामे, दुकाने बंद
जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(नंदकुमार तेली)
व्हनाळी गावात प्रतिष्ठापना सोहळा विविध धार्मिक उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला.श्री रामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केल्यानंतर सोहळ्यासाठी उपस्थित असणाऱ्या श्री. राम भक्तांना शुभेच्छा देण्यात आल्या.
- श्री.हनुमान मंदिर येथे "श्री राम मूर्ती"ची प्रतिष्ठापना ...
व्हनाळी ग्रामपंचायतच्या वतीने श्री.हनुमान मंदिर येथे अयोध्या येथे संपन्न होत असलेल्या श्रीराम मंदिर व "श्री राम मूर्ती" ची प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त' व्हनाळी गावचे सरपंच दिलीप कडवे यांच्या हस्ते श्रीराम यांच्या मुर्तीचे विधिवत पूजा करून श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली.
- विविध धार्मिक कार्यक्रम...
यावेळी व्हनाळी गावातील श्री.दत्त पंथी भजन, विठ्ठल पंथी भजन तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
- एक दिवसाचा पाळक...
यावेळी व्हनाळी गावातील सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य महिला,पुरुष, व गावातील सर्व आबालवृद्धानी हिरिरीने सहभाग नोंदवला होता. सोमवारी (दि.२२) संपूर्ण देशात सुरू असलेल्या अयोध्या येथील श्रीराम मंदिर व श्रीराममूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त गावातील सर्व नागरिकांनी शेतातील सर्व कामे बंद करून एक दिवसाचा पाळक जाहीर केला होता. तसेच गावातील सर्व मच्छी, मटन दुकाने देखील बंद ठेवण्यात आली होती.
- राम राज्याची सुरुवात ...
एकंदरीतच श्रीराम मंदिर व 'श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठापनेच्या' निमित्ताने व्हनाळी गावात तसेच संपूर्ण देशात श्रीराम यांच्या जय घोषाने सकल हिंदू धर्मामध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.यावेळी श्रीराम भक्तांनी राम राज्याची सुरुवात झाल्याच्या भावना व्यक्त केल्या.