जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
पावनगडावरील अतिक्रमण हटवल्याविषयी प्रशासनाचे अभिनंदन करत असून,अशीच कारवाई विशाळगडावरील अतिक्रमणावर लवकर व्हावी ! अशी मागणी सुनील घनवट, समन्वयक,महाराष्ट्र गड-दुर्ग रक्षण समिती यांनी केली आहे.
शासनाने यापूर्वी प्रतापगड,संग्रामगडावरील अतिक्रमण काढले,नुकतेच माहिमगड येथील अतिक्रमण हटवले आहे. महाराष्ट्रात अजूनही ३०-३५ गडांवर अतिक्रमण असून ते अतिक्रमण काढण्याची प्रक्रिया जलदगतीने होणे अपेक्षित आहे.यात प्रामुख्याने विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्याच्या संदर्भात ठोस कृती होत नसून प्रारंभी पावसाळा असल्याने अतिक्रमण हटवले न जाणे आणि आता न्यायालयीन प्रक्रियेमुळे ते न काढले जाणे यांमुळे ते निघालेले नाही.तरी सरकारने विशाळगड येथील अतिक्रमण हटवण्याच्या संदर्भात उच्च न्यायालयात चांगला अधिवक्ता देणे यांसह ज्या ज्या कृती करणे अपेक्षित आहे,त्या तात्काळ कराव्यात ! अशी मागणी सुनील घनवट समन्वयक,महाराष्ट्र गड-दुर्ग रक्षण समिती यांनी केली आहे.