जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
सांगलीमध्ये कल्पद्रुम क्रीडांगणावर,पृथ्वीराज पाटील फौंडेशन व डॉ.पतंगराव कदम फौंडेशन आयोजित श्रीराम दर्शन भक्ती उत्सवाला,आज पहिल्या दिवशी भाविकांनी अलोट गर्दी केली होती.महिला आणि पुरुष भाविकांच्या स्वतंत्र रांगा करण्यात आल्या होत्या.
सायंकाळी 5:00 वाजता अयोध्येच्या श्रीराम मंदिराच्या हुबेहुब प्रतिकृतीमध्ये प्रभू श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापना विधिवत पूजनाने करण्यात आली.कर्नाळचे श्री.नानासाहेब व सौ.निर्मला तारळेकर यांच्या हस्ते श्रीराम मंदीर दर्शन भक्ती उत्सवाला प्रारंभ झाला.त्यानंतर मंदीर दर्शनासाठी खुले करण्यात आले.महेश हिरेमठ आणि कलाकार यांचा श्रीराम भजनाचा कार्यक्रम झाला.त्यानंतर महाआरती झाली.
यावेळी पृथ्वीराज पाटील यांनी मान्यवरांचे व भाविकांचे स्वागत केले व अयोध्येहून श्रीराम मूर्ती विधीवत पूजन करुन आणण्यात आले आहे असे सांगून तत्कालीन पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांनी अयोध्येच्या श्रीराम मंदीराचे कुलुप उघडले. म.गांधी यांनी रामराज्य संकल्पना मांडली.असे नमूद करुन श्रीराम मूर्ती देऊन मान्यवरांचा सत्कार केला.
यावेळी माजी मंत्री आमदार डॉ.विश्वजीत कदम व आमदार जयंतराव पाटील,डॉ.जितेशभय्या कदम,विशालदादा पाटील, श्रीमती जयश्री पाटील,संजय बजाज दिगंबर जाधव,हरिदास पाटील,विरेंद्रसिंह पाटील,कर्मवीर पतसंस्थेचे रावसाहेब पाटील,आण्णासाहेब कोरे,मयूर पाटील,मंगेश चव्हाण,बिपीन कदम,अशोकसिंग रजपूत,तौफिक शिकलगार,शुभम बनसोडे,प्रा.एन.डी.बिरनाळे,प्रतिक राजमाने,शिवाजी मोहिते, विनायक रुपनर,विशाल कलगुटगी,अजय देशमुख,मालन मोहिते,डॉ.जयश्री पाटील,संभाजी पाटील,तानाजी पाटील सलगरे,उदय पवार,मालन मोहिते,प्रशांत देशमुख,प्रशांत कांबळे,राजेंद्र कांबळे,सनी धोतरे,महावीर पाटील,महावीर भोरे,मौलाली वंटमुरे,अनिल पाचोरे,भारती भगत,विशाल चौगुले,व सांगलीकर श्रीराम भक्त हजारोंच्या संख्येने उपस्थित होता.