शरीरास उद्भवणाऱ्या रोगावर,खालील नैसर्गिक अन्नपदार्थांचा आहारात वापर केल्यास,आजार लवकर बरे होतील. !.

0

 आरोग्य भाग- 21

जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.

(अनिल जोशी)

पुढील आजार झाल्यास त्यांच्या खाली दिलेले अन्नपदार्थ खा.  आजार लवकर बरे होतील.!-

१)  आम्लपित्त :-

काळी मनुका,आलं,थंड दुध,आवळा,जिरे खावें.

२)  मलावरोध  :-

पेरु,पपई,चोथा / फायबरयुक्त असलेले अन्न,दुध + पाणी,  कोमटपाणी,त्रिफळा चूर्ण घ्या.पोटाचे व्यायाम करा,टाँयलेटला बसल्यावर हनुवटी प्रेस करा.लवकर पोट साफ होते.

३)  हार्टअटैक / ब्लॉकेज :-

लसूण,कांदा,आलं खावें.रक्ताच्यागाठी होत नाहीत.  रक्ताभिसरण उत्तम होते.

४)  डिसेन्टरी / जुलाब :-

कापूर + गुळ एकत्र करून खावें. त्यावर पाणी प्यावें.लगेच  गुण  येतो.

५)  खोकला :-

२/३ काळीमिरी चोखा दिवसातून तीन वेळा.खोकला थांबतो.

६)  मुळव्याध :-

नारळाची  शेंडी  जाळून  राख  ताकातून  दिवसातून  २/३  वेळा घ्या.चांगला गुण येतो.रामदेव बाबांचा उपाय आहे.

७)  दारूचे  व्यसन :-

वारंवार गरम पाणी प्या.तसेच दारू पिण्याची आठवण येईल  त्यावेळी जरूर गरमच पाणी प्या.२/३ महीन्यात दारू सुटेल.

८)  डोळे  येणे :-

डोळ्यांना गाईचे तुप लावा.आराम पडेल.कापूर जवळ ठेवा.  संसर्ग वाढणार नाही.

९)  स्टोन :-

पानफुटीची पाने खा. कुळीथ भाजी खा.भरपूर पाणी प्या.  

१०)   तारूण्यासाठी :-

भाज्यांचा रस,आरोग्य पेय,फळे खा.गव्हांकुराचा रस,Green Tea,प्या.

संतुलित आहारात उपचार आहेत खरे,सर्वच आजार    नक्कीच होतील बरे.

स्रोत - आयुर्वेदाचा शोध लावणारे आणि जगातील पहिली शस्त्रक्रिया करणारे ऋषी सुश्रुत आणि वागभट्ट यांच्या ग्रंथावर आधारित.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top