जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
अयोध्या क्षेत्री लक्ष्य लक्ष लोचनांच्या साक्षीने श्री राम मंदिरात, अभूतपूर्व हर्षउल्हासात श्री रामलल्ला,सुमारे 500 वर्षानंतर मूळ जागी विराजमान झाले आहेत.काल 22 जानेवारी 2024 वार सोमवार रोजी,देशात अभूतपूर्व अशी श्री रामभक्तांनी दिवाळी दीपोत्सव साजरी केली.देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पवित्र जलप्राशनाने आपले 11 दिवसाच्या नियम व्रताची सांगता करून,श्री अयोध्या क्षेत्री भव्य दिव्य श्री राम मंदिरात, श्रीराम लल्लाच्या मूर्तीची शंखध्वनीसह विधिवत मंत्रोच्चारणाने प्रतिष्ठापना केली.
काल झालेल्या अयोध्या क्षेत्रातील अभिजात मुहूर्तावर श्री राम मंदिरात,श्री रामलल्ला च्या मूर्ती प्रतिष्ठापणेवेळी,श्रीराम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत,उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल,उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ,देश- विदेशातील साधुसंत व अनेक मान्यवर सन्माननीय व्यक्ती उपस्थित होते.
कालच्या दिवशी संपूर्ण देशभरात दिवाळी साजरी झाल्याचे सगळीकडे पहावयास मिळाले आहे.अयोध्या क्षेत्री श्री राम मंदिरात श्री राम लल्लाच्या मूर्ती प्रतिष्ठापणेवेळी,देशातील अनेक साधुसंतांसह देश- विदेशातील सन्माननीय व्यक्ती हजर होत्या.कालचा अयोध्या क्षेत्रातील झालेला श्रीरामलाच्या मूर्ती प्रतिस्थापनेचा सोहळा,देश विदेशातील कोट्यावधी रामभक्तांनी डोळे भरून बघून,ऐतिहासिक सुवर्ण क्षणाचा लाभ घेतला.सुमारे 500 वर्षानंतर श्री रामलल्लाच्या मूर्ती, अयोध्या क्षेत्री मूळ जागी अभिजात मुहूर्तावर विराजमान होऊन,आतापर्यंतच्या झालेल्या प्रवासाच्या इतिहासाला पूर्णविराम प्राप्त झाला.
दरम्यान अयोध्या क्षेत्रातील श्री प्रभू रामचंद्राचे भव्य दिव्य मंदिर हे एक उत्कर्ष व उदयाचे साक्षीदार बनून,22 जानेवारी 2024 हा दिवस सोनेरी किरणांनी इतिहासात नोंद होऊन, लोक हा क्षण व तारीख हजारो वर्षे लक्षात ठेवतील असे प्रतिपादन देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले आहे. त्याबरोबरच देशवासीयांनी सर्व मतभेदांना निरोप देऊन नवीन राम राज्याची निर्मिती करावी,रामराज्य आणणे हे नागरिकांचे कर्तव्य असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटले आहे.एकंदरीतच कालचा अयोध्या क्षेत्रातील श्री राम मंदिरात,श्री राम लल्लाच्या मूर्ती प्रतिष्ठापनेचा सोहळा,अलौकिक,अद्भुत,अभूतपूर्व असा देशवासीयांनी बघितला व देशात साजरा केला.