जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
देशाच्या राजकारणाकडे लक्ष लागून राहिलेल्या महाराष्ट्र राज्याच्या सत्तांतर प्रकरणी,आमदार पात्र-अपात्रतेबाबत आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे आपला निकाल देणार आहेत.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना,प्रथम शिवसेना कोणाची ? शिंदे गटाची का ठाकरे गटाची ? याचा निर्णय करावा लागणार असून,त्यानंतर निकालानुसार,कोणत्या गटाचे आमदार हे पात्र व अपात्र ? हे ठरणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे,आमदारांच्या अपात्रतेप्रकरणी 34 याचिका दाखल झाल्या होत्या.त्यावर आज निकाल सुनावण्यात येणार आहे.
दरम्यान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी माझा निर्णय हा कायद्याला धरूनच असणार असल्याचे प्रतिपादन केले आहे.त्याबरोबरच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर व राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या भेटीवर,शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आक्षेप घेतला असून,त्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा निकाल राज्याचे मुख्यमंत्री व त्यांच्या गटाच्या आमदारांच्या विरोधात गेला तर,मुख्यमंत्रीपद एकनाथराव शिंदे यांना सोडावे लागेल.त्याबरोबरच निकाल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे व त्यांच्या गटाच्या आमदारांच्या बाजूने लागला तर,उद्धव ठाकरे गटाचे आमदारही संकटात सापडतील.एकंदरीतच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा निकाल कोणताही असो,पण यावर सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले जाईल यात शंका नाही.