जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
मुंबईकडे,आज मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन कर्ते मनोज जरांगे पाटील व समाज बांधव रवाना झाले असून,कोणत्याही परिस्थितीत मुंबईत आंदोलन करण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत.आज महाराष्ट्र राज्य सरकारने दोन स्वतंत्रपणे शिष्टमंडळे पाठवून,मराठा समाजाचे आंदोलन कर्ते मनोज जरांगे पाटील यांचे बरोबर चर्चा केली, परंतु चर्चेत कोणताही हेतू साध्य न झाल्यामुळे,आंदोलन कर्ते मनोज जरांगे पाटील आंदोलन करण्याच्या भूमिकेवर ठाम राहिले आहेत.
दरम्यान मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय माघार घेणार नसल्याचे मराठा समाजाचे नेते आंदोलन कर्ते मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनीही आज सलग दुसऱ्या दिवशी आवाहन करून,राज्य सरकारला सहकार्य करून आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले आहे.दुसरीकडे मुंबईतील आझाद मैदानावर,मराठा समाजाच्या आंदोलनासाठी परवानगी नाकारण्यात आली असली तरी,त्याच ठिकाणी आंदोलन करण्याच्या भूमिकेवर मराठा समाजाचे नेते आंदोलन कर्ते मनोज जरांगे पाटील हे व समाज बांधव ठाम आहेत.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे,राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतः येथे चर्चेस येऊन,याबाबतीत योग्य तो तोडगा काढण्याची माझी विनंती त्यांना आहे असे मराठा समाजाचे आंदोलन कर्ते मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे हे देखील राज्य शासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करीत असून, आपल्या मूळ जन्मगाव दरे येथून मुंबईला रवाना झाले आहेत. त्याचबरोबर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्याबरोबर मराठा समाजाचे नेते आंदोलन कर्ते मनोज जरांगे पाटील यांची सुद्धा चर्चा चालू असून,यातून काहीतरी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणी बाबतीत तोडगा निघेल! अशी चिन्हे वाटत आहेत.
दरम्यान मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी विशेष अधिवेशन बोलवण्यात येणार असून, त्याबरोबरच राज्यातील सर्वेक्षण चालू असल्याने,थोडाफार अवधी देण्यात यावा असे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी म्हटले असल्याचे समजते.मुंबईतील कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने पोलीस प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेतली आहे.यापुढील महाराष्ट्र शासन मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी कोणता निर्णय घेते? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.