जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
काँग्रेस पक्षानं देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र भारतासाठी संविधान निर्माण केले. संविधानामुळे देशाचे स्वातंत्र्य व लोकशाही आणि अखंडता टिकली. प्रजासत्ताक दिन हा आपल्या स्वातंत्र्याचा व लोकशाहीचा उत्सव,आज प्रजासत्ताक दिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षात नागरिकांनी आपली कर्तव्ये आणि अधिकार समजून घ्यायला हवे.आपण सर्व भारतीय आहोत.. देशातील शेवटच्या घटकांपर्यंत संविधानाचे लाभ पोहचले पाहिजेत.राजकीय,आर्थिक व सामाजिक न्याय हे संविधानाच्या केंद्रस्थानी आहेत सर्व नागरिकांना ते मिळाले पाहिजेत.आणि ते नागरिकांना मिळवून देण्यासाठी काँग्रेस मजबूत करु या असे प्रतिपादन सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष मा.पृथ्वीराजबाबा पाटील यांनी काढले.सांगली जिल्हा शहर व ग्रामीण काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित प्रजासत्ताक कार्यक्रमात ते बोलत होते.काँग्रेस भवन व स्टेशन चौकात पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले.
सांगली काँग्रेस भवन व जुना स्टेशन चौक येथे शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष मा.पृथ्वीराज बाबा पाटील यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी उद्योगपती सी.आर. सांगलीकर,काँग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष अजित ढोले,डीसीसी बँकेचे माजी चेअरमन प्रा.डॉ.सिकंदर जमादार,शहर जिल्हा काँग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष प्रकाश जगताप,माजी उपनगराध्यक्ष उदय पवार,अशोकराव मालवणकर,प्रदेश सेवा दलाचे पैगंबर शेख,जिल्हा काँग्रेसचे सचिव सचिन चव्हाण, मौलाली वंटमुरे,अरुण पळसुले,विठ्ठलराव काळे,बाबगोंडा पाटील,हनुमंत यादव,विश्वास यादव,श्रीधर बारटक्के,ऍड भाऊसाहेब पवार,अर्जुन कोकाटे,संजय मोरे,राजेंद्र कांबळे, बिपिन कदम,गणेश काकडे,सूर्यकांत लोंढे,राजू पाटील, ओंकार जमदाडे,सौ प्रतीक्षा काळे,सौ सीमा कुलकर्णी, शमशाद नायकवडी,सुनिता मदने,मीना शिंदे,रजिया अन्सारी, आशा माळी,लालसाब तांबोळी,अनिल सुग्गाण्णावर,प्रकाश माने,सुरेश गायकवाड,किरण पाटील,संजय पाटील,एस.आर. पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते.