जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी)
महाराष्ट्र राज्यातील निवासी डॉक्टरनी आपला नियोजित संप मागे घेतला असून,निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात 10,000 रुपयांची घसघशीत वाढ करण्याचे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी दिले आहे. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत वरील निर्णय घेतला गेला असून,सेंट्रल मार्ड संघटनेच्या मागण्यानुसार, सदरहू बैठक झाली आहे.
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री,अर्थमंत्री अजित पवार यांनी निवासी डॉक्टरांच्या सर्व मागण्या आपण मान्य केल्या असून,नियोजित संप मागे घ्यावा असे आवाहन केले, त्यानंतर सेंट्रल मार्ड संघटनेने आपला नियोजित संप मागे घेतला असल्याचे प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केले आहे.
महाराष्ट्र राज्यातील निवासी डॉक्टरांच्या वस्तीगृहांची दुरुस्ती तत्काल सार्वजनिक बांधकाम विभागाने करावी तसेच राज्यातील मंजूर असलेल्या वस्तीगृहांच्या बांधकामाच्या कामांना गती देण्यात यावी,असे आदेशही राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत.
एकंदरीत महाराष्ट्र राज्यातील निवासी डॉक्टरांचा संप टळल्यामुळे,राज्यातील रुग्णांना फार मोठा दिलासा मिळाला असून,रुग्णांनी सुटकेचा निश्वास घेतलाआहे.