जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
कोल्हापुरात शिवसेना शिंदे गटाचे पहिले महाअधिवेशन, शुक्रवार दि.16 फेब्रुवारी 2024 ते शनिवार दि.17 फेब्रुवारी 2024 अखेर कसबा बावडा येथील महासैनिक दरबार हॉलच्या मैदानात पार पडणार असून,जवळपास राज्याचे 9 मंत्री,43 आमदार,13 खासदार हजर राहणार आहेत.
कोल्हापुरातील कसबा बावडा येथे महासैनिक दरबार हॉलच्या मैदानात होणाऱ्या शिवसेना शिंदे गटाच्या पहिल्या महाअधिवेशनास,राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे हे स्वतः उपस्थित राहणार असून,महाअधिवेशनासाठी भव्य मंडप घालण्यात आला असून,जवळपास तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.कोल्हापूर शहरात शिवसेनेचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे,आनंद दिघे यांचे बॅनर व कट आउट सर्वत्र झळकताना दिसत आहेत. कोल्हापुरातील बऱ्याच हॉटेलमध्ये खोल्यांचे बुकिंग शिवसेनेकडून करण्यात आले असून,शिवसेनेमध्ये झालेल्या पक्ष फुटी नंतर शिवसेना शिंदे गटाचे हे पहिलेच महाअधिवेशन कोल्हापुरात होत आहे.शिवसेना शिंदे गटाकडून या महाअधिवेशनासाठी संपूर्ण तयारी करण्यात आली असून,राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली हे पहिलेच अधिवेशन कोल्हापुरात होत आहे.
दि.16 फेब्रुवारी 2024 वार शुक्रवार रोजी सकाळी ठीक 10:30च्या सुमारास,राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे हे कोल्हापूर करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनास जाणार असून,त्यानंतर ते नियोजित असलेल्या शिवसेनेच्या महाअधिवेशनाला उपस्थित होणार आहेत,अशी माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली आहे.कोल्हापुरात होत असलेल्या शिवसेना शिंदे गटाच्या पहिल्या महाअधिवेशनामुळे,सर्वत्र जिकडे पहावे तिकडे झेंडे,पोस्टर,बॅनर पहावयास मिळत असल्यामुळे वातावरण भगवेमय झाल्याचे चित्र दिसत आहे.