जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
महाराष्ट्र राज्य पुढील 2 दिवसात,मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी पाऊस होणार असल्याचा अंदाज,भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे.
महाराष्ट्र राज्यातील मराठवाडा व विदर्भातील गडचिरोली, गोंदिया,यवतमाळ,भंडारा,चंद्रपूर,नागपूर,वर्धा,नांदेड व अमरावती आदि जिल्ह्यात पुढील 2 दिवसात विजेच्या कडकडाटासह पाऊस पडणार असल्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.
महाराष्ट्र राज्यात मराठवाडातील व व विदर्भातील काही जिल्हे सोडून राहिलेल्या भागात हवामान कोरडे राहतील. तसेच भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार मराठवाडातील व विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये होणाऱ्या विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसामुळे,शेतमालाचे नुकसान होऊ नये म्हणून, शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी व खबरदारी घ्यावी असा इशारा महाराष्ट्र राज्य शासनाने दिला आहे.