जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे मराठा आरक्षण प्रश्नासंदर्भात विचार विनिमय करण्यासाठी,मंगळवार दि.20 फेब्रुवारी 2024 रोजी,एक दिवसीय विशेष अधिवेशन बोलवण्याचा राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला असून, बैठकीच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे होते.
दरम्यान शिवजयंतीच्या मुहूर्तावर मराठा आरक्षण संदर्भात, रायगडावरील होणाऱ्या कार्यक्रमात घोषणा करून,दुसऱ्या दिवशी राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन घेतले जाणार आहे.
मी वैद्यकीय उपचार घेणार नसून,मला सलाईन लावायचे झाले तर,अगोदर मराठा आरक्षणाची अंमलबजावणी करा, राज्य शासनाने माझा अंत पाहू नये,सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात निर्णय घ्यावा,असे आवाहन मराठा समाजाचे आंदोलन कर्ते मनोज जरांगे पाटील यांनी, अंतरवाली सराटी येथे उपस्थित असलेल्या लोकांसमोर केले आहे.
एकंदरीत महाराष्ट्र राज्याचे विधिमंडळाचे एक दिवसीय अधिवेशन 20 फेब्रुवारी 2024 रोजी बोलावून,मराठा आरक्षणासंदर्भात राज्य शासनाने एक पाऊल पुढे टाकले आहे.