सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढ्यातील 24 गावांचा,प्रलंबित असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नासाठी,लोकसभा व विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय व 24 गावे कर्नाटक राज्यात जोडण्याचा ठराव.!--

0

जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.

(अनिल जोशी)

मंगळवेढा तालुक्यातील कायम दुष्काळी 24 गावांनी येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकणे व व लोकसभा आचारसंहिता पूर्वी निर्णय नाही घेतल्यास,24 गावांना कर्नाटकला जोडण्याची मागणी एकमताने,24 गावच्या बैठकीत  ठरावाने करण्यात आली.

 मंगळवेढातील दुष्काळी 24 गावे पाणी संघर्ष समितीचे निमंत्रक कृषिभूषण अंकुश पडवळे यांनी आपल्या मनोगतात 2009 ला लोकसभा निवडणुकीवर टाकलेला बहिष्कार व त्यातून मंगळवेढा उपसा सिंचन योजनेचा मार्गी लागलेला विषय 15 वर्षे सगळ्या पक्षाची सरकारे येऊन ही,आमची योजना मार्गी लागली नसल्यामुळे,शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर आक्रोश आहे.सरकारने लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी मंगळवेढा उपसा सिंचन योजनेची कॅबिनेट पुढे मंजुरी व निधीची तरतूद नाही केली तर,येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे,तसेच लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी मंगळवेढा उपसा सिंचन योजनेचा विषय मार्गी नाही लागल्यास,आचारसंहिता जाहीर होईल त्याच दिवशी 24 गावातील लोकांना कर्नाटक मध्ये  मागणीचा ठराव ही एकमताने करण्यात आला.

 बैठकीत बोलताना निंबोणीचे सरपंच बिरुदेव घोगरे म्हणाले की,मंगळवेढ्याच्या दुष्काळी 24 गावात पाण्याची भीषण टंचाई आहे.येथील शेतकऱ्यांनी जगायचे कसे असा सवाल केला.तर लक्ष्मी दहिवडीचे सरपंच अनिल पाटील यांनी 65 वर्षात जर आपणाला महाराष्ट्र सरकार न्याय देत नसेल तर आम्ही,महाराष्ट्रात राहायचेच कशासाठी?असा प्रश्न उपस्थित केला.तसेच संगीता बोराडे यांनी बोलताना सांगितले की शेतीला पाणी नसल्यामुळे महिलांना रोजगारासाठी बाहेरगावी जावे लागते.महिलांना एक एक किलोमीटर वरून पाणी आणावे लागते.शेतीला पाणी नसल्यामुळे जनावरांना चारा विकत घ्यावा लागतो असे सांगितले बाळूनीचे सरपंच लक्ष्मण गायकवाड यांनी भीषण दुष्काळातही 24 गावची योजना शासन करत नसेल तर,आपल्याला टोकाचे पाऊल उचलून सरकारला योजना करण्यास भाग पाडावे लागेल असे सांगितले.यावेळी लेंडवे चिंचाळेचे सरपंच समाधान लेंडवे, आंधळगाव चे सरपंच लव्हाजी लेंडवे,भीमराव मोरे,शहाजान पटेल,श्रीपती चौगुले,दिनेश लुगडे,विनायक माळी,आदी शेतकऱ्यांनी आपले विचार मांडले.यावेळी पाटकळचे सरपंच ऋतुराज बिले,खुपसंगीचे सरपंच कुशाबा पडोळे,उपसरपंच प्रकाश भोसले,जुनोनी चे सरपंच दत्तात्रय माने,खडकी चे सरपंच संजय राजपूत,उपसरपंच अशोक जाधव,सह गणपत लेंडवे,आनंदा पडवळे,रामचंद्र तांबे, दादासाहेब लवटे, सह 24 गावातील शेतकरी व महिला शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 बैठकीत घेण्यात आलेले ठराव.....

 बैठकीत मंगळवेढ्यातील दुष्काळी 24 गाव पाणी संघर्ष समितीचे निमंत्रक अंकुश पडवळे यांनी खालील 2 ठराव मांडले व सर्वांनी हात वर करून त्याला एकमताने पाठिंबा दिला.

1.मंगळवेढा उपसा सिंचन योजना  येत्या लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळापुढे मंजूर करून त्याला निधी मंजूर करावा,अन्यथा येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणूक बहिष्कार टाकणे. सदर ठरावाला सर्व शेतकरी व महिला शेतकरी वर्गाने हात उंच करून पाठिंबा दिला.

2. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी जर राज्य सरकारने सदर योजना मार्गी लावली नाही तर, राज्य सरकारने 64 वर्षात येथील शेतकऱ्यांच्या मूलभूत पाणी प्रश्न बाबत न्याय न दिल्याने,मंगळवेढ्याची 24 गावे कर्नाटकला जोडावी असा ठराव करण्यात आला.  

सदर बैठकीत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी, 2022 च्या पावसाळी अधिवेशनात,24 गावची योजना 15 दिवसात फायनल करतो असे सांगितले होते. या संदर्भातली विधानसभेतील त्यांची व्हिडिओ क्लिपहि बैठकीत दाखवण्यात आली.

 सदर बैठकीत बोलताना संघर्ष समितीचे निमंत्रक कृषिभूषण अंकुश पडवळे बोलत होते. यावेळी सर्व उपस्थित शेतकरी महिलांनी हात वर करून ठरावाला पाठिंबा दिला.  



.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top