जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
वृत्त- सोशल मीडिया.
देशात पुढील आठवड्यापासून,"भारत तांदूळ" 29 रुपये प्रति किलो दराने उपलब्ध करणार असल्याची माहिती केंद्रीय अन्न आणि सार्वजनिक वितरण विभाग सचिव संजीव चोप्रा यांनी नवी दिल्ली दिली आहे.सध्यपरिस्थितीत देशातील तांदळाच्या वाढत्या दरावर आळा घालण्यासाठी,केंद्र सरकारने हा निर्णय घेतला असून,केंद्र सरकारने तसे निर्देश दिले आहेत.केंद्र सरकारने किरकोळ व्यापारी,घाऊक व्यापारी तसेच तांदळाचा साठा करणाऱ्या व्यावसायिकांना,आपल्याकडे उपलब्ध असलेल्या साठ्याची माहिती देण्याचे निर्देश दिले आहेत.
केंद्रीय अन्न आणि सार्वजनिक वितरण विभाग आता, तांदळाच्या वाढत्या दरावर देखरेख ठेवणार असून,पुढील आठवड्यापासून देशातील नाफेड,केंद्रीय भांडार,राष्ट्रीय ग्राहक महासंघ आदी संस्थानमार्फत," भारत तांदूळ" 29 रुपये प्रति किलो दराने वितरित केला जाणार आहे.