जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
पुणे जिल्ह्यातील सासवड तहसील कार्यालय मधील स्ट्रॉंग रूम मधून,ईव्हीएम मशीन चोरी प्रकरणी,केंद्रीय निवडणूक आयोगाने,राज्याच्या मुख्य सचिवांना चौकशीचे आदेश दिले असून,3 अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी आज ही माहिती दिली.
केंद्रीय निवडणूक आयोगाने,पुणे जिल्ह्यातील सासवड तहसील कार्यालय मधील स्ट्रॉंग रूम मधून चोरी झालेल्या ईव्हीएम मशीननचे प्रकरण,फारच गांभीर्याने दखल घेतली असून,याप्रकरणी चौकशी करण्याचे आदेश राज्याच्या मुख्य सचिवांना दिले आहेत.
दरम्यान पुणे पोलिसांनी चोरीला गेलेले ईव्हीएम मशीन्स परत मिळवले असून,या प्रकरणी 2 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे व 1 व्यक्तीचा शोध घेण्यात येत आहे. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी देखील,पोलिसांना ईव्हीएम मशीन चोरीमागच्या सर्व गोष्टींची गांभीर्याने चौकशी करून,अहवाल देण्याचे निर्देश दिले असल्याचे स्पष्ट केले आहे.पुणे जिल्ह्यातील सासवड तहसील कार्यालय मधील स्ट्रॉंग रूम मधून चोरीस गेलेल्या ईव्हीएम मशीन प्रकरणी,तहसीलदार विक्रम राजपूत, उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे व पोलीस अधिकारी तानाजी बेर्डे अशा तिघा अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्यात आले आहे.केंद्रीय निवडणूक आयोगाने सदरहू ईव्हीएम मशीन चोरी प्रकरण फारच गांभीर्याने घेतले आहे.