जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
महाराष्ट्र राज्यातील कला व संस्कृतीच्या क्षेत्रातील 52 नाट्यगृहांचं अद्यावतीकरण करून,नवीन सुसज्ज अशी 23 नाट्यगृहं उभारणार असल्याची घोषणा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी,काल अखिल भारतीय नाट्य संमेलनाअंतर्गत महाबळेश्वर येथे आयोजित केलेल्या उद्घाटन समारंभात बोलत होते.
महाराष्ट्र राज्यातील कला व संस्कृतीच्या क्षेत्रातील समस्यां, सोयी- सुविधां सोडवण्यासाठी,महाराष्ट्र सरकार 11 सदस्यांची समिती गठित करणार असल्याची माहितीही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी दिली आहे. महाराष्ट्र राज्यातील कला व संस्कृतीचा वारसा टिकवण्यासाठी व बळ देण्यासाठी राज्यातल्या 52 नाट्यगृहांचा अद्यावतीकरण होणार असून,23 नवीन अशी सुसज्ज नाट्यगृहे उभारण्यात येणार असल्याची माहितीही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी दिली आहे.
महाबळेश्वर येथे अखिल भारतीय शतक महोत्सवी नाट्यसंमेलनाअंतर्गत आयोजित केलेल्या संमेलनाचे उद्घाटन करताना,वरील माहिती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी दिली असून,या कार्यक्रमास राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई,आमदार मकरंद पाटील,संमेलनाध्यक्ष जब्बार पटेल,माजी संमेलनाध्यक्ष मोहन जोशी,अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांचे सह राज्यातील नाट्य क्षेत्रातील पदाधिकारी,सदस्य आणि नाट्यप्रेमी रसिक नागरिक उपस्थित होते.