जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
महाराष्ट्र राज्य जेष्ठ 65 वर्षावरील व्यक्तींसाठी राज्यात मुख्यमंत्री व वयोश्री योजना लागू करणार असल्याचा राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय झाला असून,वार्षिक 2 लाख उत्पन्न असणाऱ्या 65 वर्षांवरील ज्येष्ठ व्यक्तींना,या योजनेचा लाभ होईल.आज मुंबईत झालेल्या मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाला असून,यासाठी राज्यातील आरोग्य विभाग,राज्यातील ज्येष्ठ व्यक्तींचे सर्वेक्षण करून,लाभार्थी ठरवणार आहे.
महाराष्ट्र राज्यातील "मुख्यमंत्री वयोश्री योजने"मध्ये ज्येष्ठ अपंगत्व आलेल्या व्यक्तींसाठी आवश्यक उपकरणे खरेदी करून दिली जातील.महाराष्ट्र राज्यातील जवळपास 65 वर्षांवरील जेष्ठ 15 लाख व्यक्तींना,या "मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा लाभ मिळेल अशी प्राथमिक माहिती आहे,तसेच पात्र लाभार्थ्यांना बँक खात्यात एक रकमी रुपये 3000/- जमा केले जातील.
महाराष्ट्र राज्यातील जेष्ठ 65 वर्षांवरील व्यक्तींना,या मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा लाभ होणार असल्याने,ज्येष्ठ नागरिकांच्या मध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.