जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
कोल्हापूर जिल्ह्यातील श्री दत्त क्षेत्र नृसिंहवाडी येथे,मंदिरा सभोवतालच्या सभामंडपास 8 फेब्रुवारी रोजी 51 वर्षे पूर्ण झाली असून,प्रतिवर्षी कृष्णानदीला येणाऱ्या महापुरात देखील भक्कमपणे उभा असून,राज्यातील दत्तभक्तांना एक आशीर्वादाची सावली देणारा सभा मंडप होय.
या सुंदर अशा नयन मनोहर असलेल्या सभामंडपाचे शिल्पकार आहेत,परमपूज्य योगीराज श्री गुळवणी महाराज. एकदा एका गुरुद्वादशीच्या स्नानाच्यावेळी श्री गुरु महाराज परमपूज्य गुळवणी महाराज यांच्या मनात सभामंडपाविषयी विचार आला असता,त्यांनी तो इंजिनिअर श्री वैद्य यांच्याकडे बोलून दाखवला.
14 जून 1971 रोजी देवस्थान ट्रस्टीनी,परमपूज्य योगीराज गुळवणी महाराज व दत्त महाराज श्री कवीश्वर यांचे सोबत चर्चा करून,सभामंडप बांधण्याचे अधिकार पत्र इंजिनिअर श्री वैद्य व श्री शिंगणे यांना दिले.त्यानंतर लवकरच सभामंडपाचे बांधकाम पूर्ण होऊन,8 फेब्रुवारी 1973 रोजी वास्तुशांती करण्याचा विधी संपन्न झाला.
आज 8 फेब्रुवारी रोजी या श्रींच्या मंदिरा सभोवताल असणाऱ्या सभामंडपास 51 वर्षे पूर्ण होत असून,याचा राज्यातील सर्व दत्त भक्तांना एक आनंद होत असून,त्यानिमित्ताने हा एक सभामंडप बांधकामाच्या पाठीमागचा घेतलेला असा,आध्यात्मिक सुंदर दृष्टिक्षेप आपणासमोर ठेवला आहे.