जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
महाराष्ट्रामध्ये पत्रकारावरील होणारे हल्ले- अत्याचार बघता, महाराष्ट्रातील पत्रकारीता करत असताना पत्रकारांवर येणाऱ्या अनेक अडचणीला सामोरे जावे लागते. त्याचबरोबर पत्रकारांना न्याय मिळण्यासाठी,आपण लवकरात लवकर पत्रकार महामंडळ स्थापन करावे.आज जर आपण बघितलं तर महाराष्ट्रामधल्या अनेक पत्रकारांची आर्थिक परिस्थिती ढासळलेली असल्याचे दिसून येत आहे.महाराष्ट्रामध्ये अनेक पत्रकारांना राहण्यासाठी घरे नाहीत, त्याचबरोबर साधारण गाडी घ्यायला गेलं तरी त्या पत्रकारांना कर्ज मिळत नाही,अशा अनेक समस्या आहेत.पत्रकारांच्या कुटुंबाला आरोग्य विषयक सुविधासह कुठल्याही प्रकारची सुविधा उपलब्ध होत नाहीत.पत्रकारांना चांगले उपचार देखील मिळत नाहीत.कोरोना काळामध्ये अनेक पत्रकार हे मृत्युमुखी पडलेत,मात्र त्यांना कुठलीही मदत शासनातर्फे झालेली नाही.याच हेतूने आपणास विनंती आहे की, पत्रकारांच्या सर्व समस्या दूर करण्यासाठी,केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्यामार्फत सर्व सुविधा उपलब्ध करून, पत्रकारांसाठी वेगळं महामंडळ स्थापन करावे अशी आपणास मागणी केली आहे.
आपल्या मागणीचे पत्र त्यांनी देशाचे गृहमंत्री अमित शहा,देशाचे सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले,महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे,महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देखील पाठवले आहे.देशातील पत्रकारांसाठी महामंडळ स्थापन झाले तर, पत्रकारांवरील होणारे हल्ले,त्यांच्या समस्या,आरोग्य विषयक,सुविधा राहण्यासाठी घरे,त्यांच्या कुटुंबियाना सोयी सुविधा आदी बाबतीतचे प्रश्न मार्गी लागून,पत्रकारांना एक प्रकारे दिलासा मिळेल.देशात असलेल्या पत्रकारांच्या दृष्टीने हा एक अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असून,देशातील सर्व पत्रकारांना लवकरात लवकर महामंडळ स्थापन होईल एक आशा आहे.