जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(मदन ढेकळे)
गंगापूर येथे मुख्य चौकात कमल हुंडेकर यांच्या मालकीच्या असणाऱ्या दुकान गाळ्यापैकी सर्जेराव किल्लेदार यांच्या मेडिकल दुकानात रात्री शॉर्टसर्किटने आग लागून,मेडिकल मधील औषधे व इतर साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
तसेच शेजारी असणाऱ्या कमल हुंडेकर यांच्याच मालकीच्या असणाऱ्या दुकान गाळ्यापैकी सिताराम माने यांचे सलून दुकान,तुकाराम देसाई यांचे चहाचे दुकान,व एकनाथ कांबळे यांच्या फोटोच्या दुकानांचे ३ लाखांचे नुकसान झाले.
सर्व दुकानदार हे रात्री आपली दुकाने बंद करून घरी गेल्यानंतर अचानक दुकानातून धूर बाहेर पडू लागला. त्यावेळी परिसरातील नागरिकांनी अग्निशमन दलाला पाचारण केले.आणि थोड्या वेळात अग्निशमन दलाने ही आग आटोक्यात आणली.मात्र तोपर्यंत सर्व दुकाने आगीत भस्मसात झाली होती.