जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
हुपरी-प्रतिनिधी: मुरलीधर जाधव व उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना जिल्हाप्रमुख हे समीकरण कोल्हापूरमध्ये सर्वांना परिचित आहे.पण काही दिवसापूर्वी खासदार राजू शेट्टी यांच्यावर काही टीकात्मक शब्द बोलल्यामुळे पक्षप्रमुखांनी त्यांना विचार न करता पदावरून खाली केले. मुरलीधर जाधव यांनी अनेक वर्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट जिल्हाप्रमुख म्हणून अनेक वर्ष काम पाहिले आहे.त्यामध्ये त्यांनी अनेक आंदोलने केली रास्ता रोको आंदोलन,चप्पल फेक आंदोलन,वीज बिलासाठी आंदोलन,पाणीपुरवठा आंदोलन,तसेच शेतकऱ्यासाठी देखील आंदोलन केली.अशा प्रामाणिक कार्यकर्ताचा विचार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांनी केला नाही.त्यांचे इतकेच म्हणणे होते की आपला हक्काचा शिवसेना उबाठा पक्षाचा उमेदवार पक्षप्रमुखांनी द्यावा.४ जानेवारी ते १४ फेब्रुवारी पर्यंत त्यांनी वाट पाहिली,व उबाठा गटाचा त्यांनी १५ तारखेस राजीनामा दिला.
१७/२/२४ रोजी ५००० हजार कार्यकर्त्यांसह शिवसेना शिंदे गटांमध्ये कोल्हापूर गांधी मैदानावर होणाऱ्या जाहीर सभेमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व महाराष्ट्राचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत ते शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.तळागाळातील सामान्य कार्यकर्त्यापासून त्यांनी चांगली अशी बांधणी करून एक सच्चा शिवसैनिक म्हणून त्यांनी आतापर्यंत काम पाहिले आहे.फार मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी शिवसेना सभासद नोंदणी करून दाखवली आहे.अशी माहिती त्यांनी यावेळी पत्रकार परिषदेमध्ये दिली.