जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
कोल्हापुरात कृषी पणन मंडळातर्फे उत्पादक ते ग्राहक थेट विक्री संकल्पना असलेल्या,मिलेट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.नाबार्ड महाक्षेत्रीय कार्यालय व महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ यांच्यामार्फत,दि.24 फेब्रुवारी 2024 ते दि.27 फेब्रुवारी 2024 पर्यंत व्ही.टी.पाटील स्मृती भवन,राजारामपुरी येथे मिलेट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून,महोत्सवाचे उद्घाटन शनिवार दि.24 फेब्रुवारी 2024 रोजी कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या शुभहस्ते,सकाळी 11:00 वाजता संपन्न होणार आहे.सदरहू मिलेट महोत्सवाच्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी हे असणार असून,या कार्यक्रमास कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त के.मंजूलक्ष्मी,जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी संतोष पाटील,पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित,कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम,नाबार्डचे सर्व व्यवस्थापक प्रदीप पराते,विभागीय विभागीय कृषी सहसंचालक बसवराज बिराजदार, जिल्ह्याचे कृषी अधिक्षक भिंगार दिवे,जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने हे उपस्थित राहणार आहेत.
शेतकऱ्यांना योग्य बाजारभावामध्ये,थेट ग्राहकांना विक्री करण्याचा उद्देश सफल व्हावा व विक्री करण्याच्या साखळीतील दलाल माध्यमाशिवाय विक्री करता यावी हा उद्देश लक्षात ठेऊन,मिलेट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.कोल्हापुरात रंगणाऱ्या चार दिवसीय मिलेट महोत्सवात,कृषी क्षेत्रातील सुप्रसिद्ध तज्ञांची मार्गदर्शनपर व्याख्याने,महिलांसाठी स्पर्धा,विविध प्रकारचे स्टॉल, त्याबरोबरच खरेदीदार आणि विक्रेते यांचे एकत्रीकरण असे एकंदरीत कार्यक्रमाचे स्वरूप असणार आहे.
कोल्हापूर करवीर निवासिनी शहरवासीयानी मिलेट महोत्सवा भेट द्यावी व या मिलेट महोत्सवाचा आनंद घ्यावा असे आवाहन,कृषी पणन मंडळाचे उप सरव्यवस्थापक डॉ. सुभाष घुले व नाबार्डचे उप सरव्यवस्थापक आशुतोष जाधव यांनी केले आहे.