जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुका काँग्रेस सेवा दलाच्या नूतन कार्यकारणी सदस्यांचा,राहुल गायकवाड उपसभापती आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सत्कार करण्यात आला.सोमवार दि.19 फेब्रुवारी रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती आटपाडी येथे, आटपाडी तालुका काँग्रेस सेवा दलाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवण्यात आली होती.
यावेळी आटपाडी तालुका अध्यक्ष राजेंद्र सावंत,कार्याध्यक्ष हनुमंत यादव,निवृत्ती खंदारे,उपाध्यक्ष रामचंद्र कोळेकर, विकास जाधव,नारायण मोठे,महिलाच्या अध्यक्षा सौ.शिला वेदपाठक,उपाध्यक्ष श्रीमती शोभा गायकवाड,सौ.आशा बनसोडे इत्यादींचा शाल व गुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.यावेळी सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष अजित ढोले,अनिल भिंगे यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी बोलताना राहुल गायकवाड यांनी आटपाडी तालुक्यांमध्ये,काँग्रेसला जास्तीत जास्त मतदान करून,काँग्रेसचा खासदार निवडून आणणार आहे.
आटपाडी तालुक्यांमध्ये दुष्काळ परिस्थिती असताना स्वर्गीय डॉक्टर पतंगराव कदम साहेब यांनी पुनर्वसन खात्याकडून भरीव मदत केली,त्याच पद्धतीने माजी मंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनीही आटपाडी तालुक्यासाठी भरीव मदत केली आहे.युवक काँग्रेसच्या माध्यमातून त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यामध्ये चांगले संघटन उभे राहिले होते. त्याच पद्धतीने सेवा दलाची संघटना ही आटपाडी तालुक्यांमध्ये मजबूत करून,आटपाडी तालुक्यांमध्ये काँग्रेसचे उमेदवार विशाल दादा पाटील यांना निवडून आणण्यासाठी आम्ही शर्तीचे प्रयत्न करू असे त्यांनी आपल्या मनोगत व्यक्त केले.यावेळी सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष अजित ढोले यांनी जिल्ह्यामध्ये कडेगाव तालुका,खानापूर तालुका यामध्ये संघटना मजबूत आहे.त्याचप्रमाणे आटपाडी,कवठेमंकाळ,जत येथेही संघटनेवर लक्ष देऊन, संघटना मजबूत करण्यासाठी आठवड्यातून 3 दिवस दौरा करून,काँग्रेसच्या उमेदवारासाठी प्रयत्न करणार आहोत असे आपल्या मनोगतामध्ये व्यक्त केले.