जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
गेल्या ४ वर्षांपासून सांगली जिल्ह्यातील कायम दुष्काळग्रस्त असणाऱ्या जत तालुक्यावरील दुष्काळाचा कलंक पुसून काढणेसाठी खासदार संजयकाका पाटील यांच्या माध्यमातून व त्यांच्या पाठपुराव्याने कृष्णा-कोयना उपसा जलसिंचन प्रकल्प अंतर्गत म्हैसाळ विस्तारीत जत उपसा सिंचन योजना कार्यांवीत करणेसाठी प्रयत्न सुरु होते.त्याच अनुषंगाने मार्च २०१९ मध्ये जत तालुक्यातील वंचित गावांना म्हैसाळ योजनेतून पाणी मिळण्यासाठी खासदार संजयकाका पाटील व मा.आमदार विलासराव जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठकीचे आयोजन करुन ही योजना पुर्णत्वासाठी लढा उभा करण्यात आला होता.राज्य शासनाने या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देवून म्हैसाळ विस्तारीत जत उपसा सिंचन योजनेस मंजूरी दिली होती. त्याच योजनेची आज निविदा प्रसिद्ध करण्यात आलेली आहे,त्यामुळे जत तालुक्यातील वंचीत गावांना लवकरात लवकर पाणी देण्यास मदत होणार आहे.
म्हैसाळ विस्तारीत जत उपसा सिंचन योजनेच्या प्रसिद्ध झालेल्या निविदेनुसार कृष्णा-कोयना उपसा जलसिंचन प्रकल्प अंतर्गत म्हैसाळ विस्तारीत जत उपसा सिंचन योजनेमधील मुचंडी-लवंगा,कोळगिरी गुड्डापूर गृरुत्व नलिका तसेच त्यावरील उमराणी व वाषाण वितरिकेचे बंदिस्त नलिकेद्वारे काम करणे व पुढील पाच वर्षे देखभाल,दुरुस्ती व परिचलन करणे अशी ९७९.३५ कोटी रकमेची निविदा प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
तसेच सद्यस्थितीत विस्तारीत योजनेची कामाची ३ पंपगृहे, ऊर्ध्वगामी नलिका,जोड प्रवाही नलिका,बोगदा कामे व वितरण हौद अशी रक्कम रू. ९८१.६१ कोटीची एकूण ५७ किमी लांबीपैकी १७ किमी मधील खोदकाम पूर्ण झाले असून ११ किमी लांबीतील नलिका काम पूर्ण झालेले आहे.यामुळे वंचित भागातील शेतकऱ्यांकडून आनंद व समाधान व्यक्त होत आहे.