आरोग्य भाग-39.
जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
हर्नियाला मराठीत 'आंतरगळ' असे म्हणतात.यात आतड्याचा काही भाग हा पोटाच्या स्नायूंमधून निसटतो, बाहेर येतो.स्नायूतून पुढे आल्याने पोटावर मध्यरेषेत, बेंबीजवळ हर्नियाचा फुगवटा दिसतो.क्वचित पोटाच्या कुठल्याही शस्त्रक्रियेनंतर त्या भागातील पोटावरचे स्नायू कमकुवत होऊन तिथे आंतरगळ होऊ शकतो.
जांघेत होणारा हर्निया अधिक आढळतो.कधीकधी मुलांमध्ये अंडकोषामध्ये हर्निया होतो.जेव्हा आतड्याचा भाग जांघेतून खाली उतरतो,त्याने आलेला जो फुगवटा आलेला असतो तो खोकल्याने,शिंकल्याने,वजन उचलल्याने वाढतो.कारण या सर्व क्रियेत पोटावर दाब येत असतो. फुगवटा आत ढकलला,तर कमी होतो.
या आजारावर शस्त्रक्रिया हाच एकमेव उपाय आहे.हर्निया झाल्यावर लगेच वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक असते. हर्निया कधीकधी तसाच बाहेर राहून अडकतो.अशा वेळेस तो भाग दुखरा होतो.ताप,मळमळ,उलट्या अशी धोकादायक लक्षणे निर्माण होऊ शकतात.म्हणून हर्नियाचे ऑपरेशनच करून घेणे चांगले होय.
डाॅ.अंजली दिक्षित व डाॅ.जगन्नाथ दिक्षित यांच्या पुस्तकातून श्री.दीपक तरवडे यांनी संकलित केली असून,श्री.संतोष सावंत सर यांचे संपादन करून,जनहितार्थ प्रसिद्ध करण्यात येत आहे.