जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
परभणी येथे इंडियन रिपोर्ट्स असोसिएशन इंटरनॅशनल नवी दिल्ली चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संजय कुमार कोटेचा यांचा वाढदिवस परभणी जिल्हा शाखेच्या वतीने सुपर मार्केट परिसरातील डॉ.बाबासाहैब आंबेडकर विद्यालयांमधील विद्यार्थ्यांना वही,पेन व बिस्किट पुड्याचे,उपस्थित मान्यवरांचे हस्ते वाटप व भोजनदानाने वाढदिवस साजरा करण्यात आला.
यावेळी 'बार्टी 'चे मा.समन्वयक तथा महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध जेष्ठ साहित्यिक दी.फ.लोंढे,आदीम विकास परिषदेचे जेष्ठ नेते निवृत्ती रेखडगेवार सर,रुग्ण हक्क समितीचे परभणी जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर,उपाध्यक्ष शेख सरफराज , डॉक्टर आंबेडकर विद्यालयाचे शुभम नेताने, दैनिक शब्दरंग चे संपादक राजेश कांबळे,हिंगोली जिल्ह्यातील ग्रामीण पत्रकार बाळासाहेब भगवानराव कांबळे यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.
काल दि.7 फेब्रुवारी 2024 रोजी माता रमाई भीमरावजी आंबेडकर यांचीही जयंती असल्याकारणाने या दिनाचे औचित्य साधून सर्वप्रथम जेष्ठ पत्रकार मदन (बापू) कोल्हे यांचे हस्ते तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या मुर्ती समोर पुष्प अर्पण करून वंदन केल्यानंतर माता रमाईचे प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले तर नंतर इंडियन रिपोटर्स असोसिएशनचे परभणी मीडिया चीफ देवानंद वाकळे यांनी आपल्या प्रास्तविकामधून माता रमाई आंबेडकर यांना अभिवादन केल्यानंतर इंडियन रिपोर्टर्स असोसिएशनचे नवी दिल्ली च्या महाराष्ट्र शाखेचे अध्यक्ष संजय कुमार जी कोटेचा यांच्या वाढदिवसानिमित्त आपल्या प्रास्ताविकामधून माहिती विषद केली तर प्रमुख पाहुणे दी.फ.लोंढे यांनी माता रमाई विषयी आपल्या अभ्यासपूर्ण भाषणाने उपस्थित मान्यवर, विद्यार्थी वर्ग, शिक्षक वृंद यांना मंत्रमुग्ध केले.आदीम विकास परिषदेचे नेते निवृत्ती रेखडगेवार सर यांनीही आपले मनोगतामध्ये माता रमाई यांना अभिवादन करुन संजय कुमार कोटेचा यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप करण्यात येवून उपस्थित मान्यवर व पत्रकारांना भोजनदानाने संजय कुमार कोटेचा यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेंद्र काळे सर यांनी केले.परभणी जिल्हाध्यक्ष मदन(बापू) कोल्हे यांनी आयोजित केलेल्या या वाढदिवस व अभिवादन कार्यक्रमास डॉक्टर आंबेडकर विद्यालयाचे संचालक दीपक खंदारे सर, 'ईरा ' चे सचिव डॉ .प्रा.प्रवीण खरात सर, मा.विशेष कार्यकारी अधिकारी तथा मीडिया चीफ देवानंद वाकळे, गंगाखेड तालुका अध्यक्ष राजेश कांबळे यांनी सहकार्य केले. यावेळी सारोळा ता.वसमत येथील सुदाम निवृत्ती कोल्हे आदी मान्यवरासह विद्यालयातील शिक्षक वृंद शिंदे सर, डांगे सर,पंडित मॅडम,पतंगे मॅडम व खंदारे मॅडम,मकरंद सर यांची ही उपस्थिती लाभली होती.