जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
देशातील आसाम,सिक्कीम,नागालँड,अरुणाचल प्रदेश आदी भागात पुढील 2 दिवस मुसळधार पावसासह बर्फ पडण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे.देशातील केरळच्या किनारपट्टी लगत व आंध्र प्रदेश मध्ये उद्यापर्यंत उष्ण व दमट हवामान राहणार असून, पुढील 2 दिवस सिक्कीम,नागालँड,आसाम,अरुणाचल प्रदेश येथे मुसळधार पाऊस होण्याचाही अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे.
एकंदरीत देशातील सर्वच भागात हवामानामध्ये बराच बदल होत असताना दिसत आहे.देशातील अनेक राज्यात हवामानाच्या प्रदूषणामध्ये तसेच पाण्याच्या प्रदूषणामध्ये सुद्धा वाढ होताना दिसत असून तसेच अनेक ठिकाणी वृक्षतोड होत असल्याकारणाने वरचेवर हवामानात बदल होताना दिसत आहेत.