जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
पुणे व ठाणे येथे राज्यस्तरीय नमो महारोजगार मेळावा आयोजित करण्यात आला असून,ठाण्यामध्ये हायलँड ग्राउंड,ढोकाळी,माजिवडा,ठाणे(पश्चिम)येथे दि.29 फेब्रुवारी 2024 ते 01 मार्च 2024 पर्यंत होणार आहे.पुण्यामधील बारामतीमध्ये विद्या प्रतिष्ठानचे कला,वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय येथे,दि.02 मार्च 2024 रोजी नमो महारोजगार मेळावा होणार आहे.पुणे आणि ठाणे येथे होणाऱ्या नमो महा रोजगार मेळाव्यात,औद्योगिक आस्थापनांच्या संस्था व त्याचबरोबर उद्योजक सहभागी होणार असून,राज्यातील गरजू उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन सहाय्यक आयुक्त संगीता खंदारे कौशल्य विकास रोजगार उद्योजकता विभाग यांनी केले आहे.
पुणे व ठाणे जिल्ह्यातील सर्व खाजगी आस्थापनांच्या संस्थानी व उद्योजकांनी आपल्याकडे असलेली रिक्त पदांची माहिती https://www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर अधिसूचित करण्यात यावी,शिवाय गरजू उमेदवारानी वरील संकेतस्थळाचा वापर करून,माहिती उपलब्ध करून घ्यावी.
पुणे व ठाणे येथे होणाऱ्या नमो महारोजगार मेळाव्यात कोणत्याही शाखेतील पदवीधर, अभियांत्रिकी पदविका,आयटीआय क्षेत्रातील उमेदवार व दहावी बारावी चे उमेदवार पात्र असणार असून,सर्व उमेदवारांनी शैक्षणिक कागदपत्रांच्या सर्टिफिकेटसह नमो महारोजगार मेळाव्यात मुलाखतीसाठी उपस्थित राहावे.सर्व उमेदवारांनी अधिक माहिती प्राप्त करून घेण्यासाठी,जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र कोल्हापूर फोन नंबर:-2031-2545677 वर फोन करून माहिती घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.