जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
महाराष्ट्र राज्याच्या सोमवारी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये, सांगोला उपसा सिंचन योजनेस( स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेस) सुधारित प्रशासकीय मान्यता मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांची आमदार शहाजी बापू पाटील यांनी, सांगोला उपसा सिंचन योजनेस,सोमवारी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी द्यावी अशी नुकतीच मागणी केली होती व त्यानंतर जलसंपदा प्रधान सचिव व राज्याचे मुख्य सचिव यांना,मंत्रिमंडळ बैठकीमध्ये,सांगोला उपसा सिंचन योजनेच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेसाठी प्रस्ताव ठेवण्याचे आदेश दिले होते.त्यानुसार आता सोमवारच्या महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये,सदरहू सांगोला उपसा सिंचन योजनेच्या( स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजना) सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याचा विषय घेण्यात आला असल्याचे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या सांगली दौऱ्याच्या वेळी,आमदार शहाजी बापू पाटील यांनी,सांगोला उपसा सिंचन योजनेस मान्यता देण्याबाबत,भेट घेऊन मागणी केली होती.आता सांगोला उपसा सिंचन योजनेस सोमवारी होणाऱ्या राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये सुधारत प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर,सदरहू योजना मार्गी लागेल हे आता स्पष्ट झाले आहे.