जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
वृत्त-सोशल मीडिया
भारतीय संगीत क्षेत्रातील प्रसिद्ध तबलावादक झाकीर हुसेन यांचे सह संगीतकार गायक शंकर महादेवन यांच्या शक्ती ब्रॅंडच्या धिस मोमेंट या अल्बमने,यंदाचे ग्रॅमी पुरस्कांर पटकावले आहेत.भारतीय संगीत क्षेत्रातील प्रसिद्ध बासरी वादक राकेश चौरासिया यांनाही ग्रॅमी पुरस्कार मिळाला असून,एकूण 5 भारतीय प्रसिद्ध कलाकारांना,ग्रॅमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
संगीत क्षेत्रातील सर्वोच्च समजल्या जाणाऱ्या 66 व्या ग्रॅमी पुरस्कारांचा समारंभ,लॉस एंजल्स मधील क्रिप्टो डॉट कॉम एरीना येथे,भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी 6:30 चे सुमारास संपन्न झाला.भारतीय संगीत क्षेत्रातील प्रसिद्ध तबलावादक झाकीर हुसेन,संगीतकार गायक शंकर महादेवन, जेष्ठ गिटार वादक जॉन मॅकलॉलीन,व्ही.सेल्वा गणेश, व्हायोलीन वादक गणेश राजगोपालन अशा संगीत क्षेत्रातील प्रसिद्ध कलावंतांनी धिस मोमेंट या अल्बमची निर्मिती केली असून, सर्वोत्कृष्ट जागतिक संगीत अल्बम म्हणून यंदाचा ग्रॅमी पुरस्कार पटकावला आहे.
भारतीय क्षेत्रातील प्रसिद्ध तबलावादक झाकीर हुसेन यांना यंदा 3 ग्रॅमी पुरस्कार मिळाले असून,प्रसिद्ध ज्येष्ठ बासरी वादक हरिप्रसाद चौरसिया यांचे पुतणे यांना देखील पुरस्कार मिळाला आहे.भारतीय संगीत क्षेत्रातील 5 प्रसिद्ध कलाकारांना यंदाच्या ग्रॅमी पुरस्कारामध्ये स्थान मिळाल्यामुळे,भारतीय संगीत क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.