जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
आज दि.22/2/2024 रोजी टिळक भवन मुंबई येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी तर्फे राज्य निवड मंडळ बैठक संपन्न झाली.आगामी येऊ घातलेल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आजच्या बैठकीस महत्त्व आले आहे.आजच्या बैठकीत महाराष्ट्रातील काँग्रेसचे आगामी लोकसभेचे उमेदवार ठरवण्यासंबंधी चर्चा होणे अपेक्षित आहे,तसेच सध्याचे राजकीय परिस्थिती यावर देखील चर्चा होण्याची शक्यता आहे.
यावेळी महाराष्ट्र राज्याचे प्रभारी आमदार.श्री.रमेश चेंन्नीथला,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार श्री.नाना भाऊ पटोले, माजी मंत्री गटनेते आमदार श्री. बाळासाहेब थोरात,विरोधी पक्षनेते आमदार श्री.विजय वडेट्टीवार,माजी मुख्यमंत्री आमदार श्री.पृथ्वीराज चव्हाण,मा.श्री.आरिफ नसीम खान,माजी मंत्री आमदार श्री.अमित देशमुख,माजी मंत्री आमदार श्री.विश्वजीत कदम,आमदार श्रीमती वर्षाताई गायकवाड,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादल प्रदेश अध्यक्ष श्री.विलास औताडे,इतर मान्यवर व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.