शारीरिक आरोग्यातील मुळव्याध रोगावर(पाइल्स),अत्यंत सोप्या व सुलभ घरगुती उपायांची माहिती.!--

0

 आरोग्य भाग- 37


जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.

(अनिल जोशी)

एका अध्ययनात किमान 50 टक्के लोकांना 50 वर्षाच्या वयापर्यंत पाईल्स होण्याची शक्यता असते.हा एक सामान्य आजार आहे ज्याचा संक्रमण पसरत नाही.पाईल्सवर उपचार असतो पण लोकांना डॉक्टरकडे जाण्यास थोडी शरम वाटते.हा आजारपण वाढल्याने त्यातून रक्त येऊ लागत आणि फार दुखू लागत ज्यामुळे बसायला त्रास होतो. यासाठी आम्ही तुम्हाला काही घरगुती उपचार सांगत आहोत,ते केल्याने नक्कीच आराम मिळेल.

1. कोमट पाण्याने स्नान : दिवसातून तीन वेळा गरम पाण्याने स्नान करावी किंवा पाण्यात थोड्यावेळासाठी बसावे.त्या जागेवरची त्वचा ठीक होईल आणि जळजळ देखील कमी होण्यास मदत मिळेल.

2. संतुलित आहार घ्या : पाईल्स बरे करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला संतुलित आहार घेणे सुरू केले पाहिजे. ज्यामुळे कब्‍ज व पोटदुखी इत्यादीची समस्या दूर होते. जेवणात हिरव्या भाज्या,पाले भाज्या,ब्राउन राईस,दूध,सुजी इत्यादीचे सेवन करा.

3. बर्फाचा शेक द्या : ज्या भागात जळजळ होत असेल,तेथे बर्फाचा तुकडा ठेवा,याने आराम मिळेल व सूज कमी होण्यास मदत मिळेल.

4. एलोवेरा: पाईल्स झाल्यावर एलोवेरेला कापून आतला गर त्या जागेवर लावल्याने फायदा होतो.याचे जेल,जळजळ शांत करतो आणि सूज देखील कमी करण्यास मदत करतो.

5. लिंबाचा रस : तुम्हाला हे ऐकून आश्चर्य होईल,पण पाईल्स झाल्यावर लिंबाचा रस त्या जागेवर लावल्याने फार फायदा होतो.सुरुवातीत जळजळ होते पण थोड्यावेळाने आराम मिळतो.

6. जैतूनाचे तेल : जैतूनाचे तेल फारच उपयोगी असत.यात एंटीऑक्‍सीडेंट असत जे त्वचेची जळजळ शांत करत. पाईल्स झाल्यावर कॉटन बॉलमध्ये तेल घेऊन प्रभावित जागेवर लावायला पाहिजे.याने आराम मिळेल.

7. इतर प्राकृतिक उपाय: बर्‍याच वेळेपर्यंत ऐकाच मुद्रेत बसून राहणे टाळावे.व्यायाम करावा आणि रक्त आल्यावर लगेचच तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

मुळव्याध रोगावर वरील घरगुती उपाय करून देखील फरक पडला नाही तर,लागलीच तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करावेत.

हा लेख श्री.संतोष सावंत सर आरोग्य आणि समर्थ सोशल फाउंडेशन यांचे कडून संपादन करून,जनहितार्थ प्रसिद्ध करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top