जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
वृत्त-सोशल मीडिया
पाकिस्तानात मुस्लिम लीग नवाज पक्षाचे अध्यक्ष शहाबाज शरीफ यांची प्रधानमंत्री म्हणून निवड होण्याची दाट शक्यता असून,पाकिस्तान मुस्लिम लीग नवाज पक्षाने प्रधानमंत्री पदाचा उमेदवार म्हणून,त्यांची उमेदवारी जाहीर केली आहे.पाकिस्तान पीपल्स पार्टीने आपण सरकारात सामील होणार नसून,मात्र सरकारला पाठिंबा देऊ असे सुतोवाच केले आहे.
पाकिस्तान मधील तेहरीक इन्साफ पक्षाने पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून यांची उमेदवारी जाहीर केली आहे. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान हे तेहरीक इन्साफ पक्षाचे सर्वेसर्वा असून,नुकत्याच झालेल्या निवडणुकीत त्यांच्या पाठिंब्याने 92 उमेदवार निवडून आलेले आहेत.
पाकिस्तानातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता, निवडून आलेले 92 उमेदवार यांचा गट जरी मोठा असला तरी,पक्ष नसल्यामुळे त्यांना आपले सरकार स्थापन करता येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.एकंदरीत पाकिस्तानातील नेतृत्वाची राजकीय अस्थिरता लवकरच संपुष्टात येईल अशी चिन्हे आहेत.